नगर : महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने रब्बी हंगामाच्याही पेरणीवर संकट निर्माण झालं आहे. असं असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यात काही भागांत पावसाच्या सरी (Showers of rain) बरसत आहेत. हा पाऊस सगळीकडे झालेला नसला तरी पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुका परिसरातील शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. जमिनीत ओलावा निर्माण होत असल्याने हरभरा, ज्वारी आणि गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत पावसाने साथ दिल्यास रब्बीच्या पेरणीला गती मिळू शकते.
नक्की वाचा : दुष्काळग्रस्तांना केंद्राकडून मिळणार वाढीव मदत; कोणत्या पिकाला किती मदत?
यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात अवघा २९५ मि.मी. म्हणजेच (६८ टक्के) पाऊस झाला. सरासरी या कालावधीत ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १५३ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. सरासरीच्या केवळ ६५.९ टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला होता. त्यात रब्बी हंगामासाठी आवश्यक ओलावा नसल्याने शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती. अशा परिस्थितीत गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे काही भागांत पेरणीच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
अवश्य वाचा : ‘अल निनो’नंतर आता ‘ला निना’चा तडाखा? नेमका फरक काय?
पाच दिवसांत ७.१ मि.मी. पाऊस (Ahilyanagar News)
अहिल्यानगर जिल्ह्यात मागील पाच दिवसांत ७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात नगर तालुक्यात २२.७ मि.मी., पारनेर ११.४ मि.मी., श्रीगोंदा ३८.६ मि.मी., कर्जत ३.७ मि.मी., जामखेड १.९ मि.मी., राहुरी २.५ मि.मी., संगमनेर ३.२ मि.मी., अकोले ७.८ मि.मी., कोपरगाव ९.१ मि.मी., राहुरी १.६ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच हा पाऊस शेतकऱ्यांसाठी तेवढा खास झालेला नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी विभागाने रब्बीसाठी सुमारे ४ लाख ६३ हजार ५७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. मात्र, २ नोव्हेंबरपर्यंत केवळ ४१ हजार ९१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. प्रामुख्याने विहीर, बोअरवेल किंवा अन्य जलस्रोतांद्वारे पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पावसाअभावी कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी खोळंबली होती. आता पावसाच्या सरींमुळे हरभरा, ज्वारी आणि गहू या पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
रब्बीच्या हंगामात नेमकी किती पेरणी झाली? (Ahilyanagar News)

एवढ्या हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात आणखी थोडा पाऊस जर झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.



