Primary School Teacher : ‘आम्हाला शिकवू द्या’; अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा एल्गार!

Primary School Teacher : ‘आम्हाला शिकवू द्या’; अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा एल्गार!

0
Primary School Teacher : ‘आम्हाला शिकवू द्या’; अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा एल्गार!
Primary School Teacher : ‘आम्हाला शिकवू द्या’; अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा एल्गार!

बीएलओच्या कामातून वगळण्याची मागणी; अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर हजारो शिक्षकांचा निषेध मोर्चा

Primary School Teacher : नगर : शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, वारंवार मागविण्यात येणारी ऑनलाइन माहिती आणि बीएलओ (BLO) कामाची सक्ती याविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी (Primary School Teacher) बुधवारी (ता. ४ ) जोरदार आवाज उठवला. ‘आम्हाला शिकवू द्या’ असा नारा देत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी वाडिया पार्क ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. या मोर्चातून शासनाच्या शिक्षण व शिक्षकविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना

शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षकांच्या हातात मागण्यांचे फलक आणि घोषणांमधून आपल्या भावना व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. अध्यापनासाठी शिक्षकांची नियुक्ती असताना त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळी शासकीय कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अध्यापनावर परिणाम (Primary School Teacher)

शाळांमधील अध्यापनाचा वेळ ऑनलाइन माहिती भरणे, विविध सर्वेक्षणे, प्रशासकीय कामे आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या नोंदी करण्यात जात आहे. त्यातच बीएलओच्या कामाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविल्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत आहे. शिक्षकांना शिकविण्याऐवजी कागदपत्रे आणि ऑनलाइन कामांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भूमिका शिक्षकांनी मांडली.

Primary School Teacher : ‘आम्हाला शिकवू द्या’; अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा एल्गार!
Primary School Teacher : ‘आम्हाला शिकवू द्या’; अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा एल्गार!

या मोर्चाद्वारे अशैक्षणिक कामे तातडीने बंद करावीत, प्राथमिक शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम करू द्यावे, वारंवार मागविण्यात येणारी ऑनलाइन माहिती आणि लिंकचा भडीमार थांबवावा, विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार न करता उपक्रमांची सक्ती करू नये, माहितीचा वार शनिवार या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

शिक्षक समन्वय समितीचे शिक्षक नेते बापू तांबे, प्रवीण ठुबे, प्रकाश नांगरे, नारायण पिसे आणि राजेंद्र निमसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


‘शिक्षक शिकविण्यासाठी आहेत, अशैक्षणिक कामांसाठी नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल, तर शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ मिळणे आवश्यक आहे,’ अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी मांडली.