Chairmanship of District Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी विखे, राजळे, कोल्हे, गडाख यांची नावे चर्चेत; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

नव्या संचालक मंडळात नव्या व जुन्यांचा संगम झाल्याचे दिसून येते

0

Chairmanship of District Bank : नगर : जिल्हा सहकारी बँकेत (District Cooperative Bank) सर्वाधिक जागा जिंकून वर्चस्व मिळवणारे भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या युतीने बाजी मारली आहे. आता बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, यासोबत अंतिम निर्णय कोणाचा असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या तरी भाजपकडून आमदार मोनिका राजळे, डॉ. सुजय विखे पाटील व बिपीन कोल्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांची नावे चर्चेत आहेत. यासंबंधीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच सांगितले आहे.

नक्की वाचा : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय

महिलेला संधी देण्याचाही विचार

जिल्हा बँकेत आतापर्यंत महिला अध्यक्ष झालेली नाही. यावेळी तब्बल सहा महिला संचालक झाल्या आहेत. त्यामुळे आता तरी महिलेला अध्यक्षपदाची संधी द्यावी, असा एक विचार पुढे आला आहे. याशिवाय अध्यक्षपदाचा कालावधी विभागून जास्तीत जास्त संचालकांना संधी द्यावी, असाही विचार पुढे आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

युती असली तरी पक्षीय विचार? (Chairmanship of District Bank)

या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षीय राजकारण विसरून युती केली होती. असे असले तरी विजयानंतर मात्र, कोणाचे किती संचालक निवडून आले, असा हिशोब मांडला जाऊ लागला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीतही हा निकष लावला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोघांकडूनही युती कायम राहणार आणि अध्यक्षाची निवड एकमताने आणि बिनविरोध होणार, असे सध्या तरी ठासून सांगितले जात आहे. मात्र, अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यातील अन्य संस्थांसंबंधी भाजपचे निर्णय पाहिले, तर त्यापेक्षा वेगळा निर्णय नगरच्या जिल्हा बँकेत होणार नाही, अशीही चर्चा आहे. येथे भाजपचे 8 संचालक असल्याने यापैकी कोणाला संधी मिळते की हे पद सुरवातीला अन्य पक्षाकडे जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

बँकेत 10 जुने 11 नवे चेहरे

नव्या संचालक मंडळात नव्या व जुन्यांचा संगम झाल्याचे दिसून येते. 10 संचालक पूर्वीचा अनुभव असलेले तर 11 प्रथमच बँकेत आले आहेत. आमदार मोनिका राजळे, बिपीन कोल्हे, अक्षय कर्डिले, शंकरराव गडाख, करण ससाणे, दत्ता पानसरे, अनुराधा नागवडे, आशुतोष काळे, वैभव पिचड व गणपत सांगळे हे जुनेच आहेत.तर डॉ. सुजय विखे पाटील, राजश्री घुले, सचिन घुमरे, सचिन जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, खासदार निलेश लंके, संजीवनी शिंदे-गायकर, ज्योती शिंदे, संगीता वाघ, कारभारी जावळे व रणजित देशमुख नव्याने बँकेत येत आहेत. त्यामुळे अध्यक्षपद जुन्या अनुभवी संचालकांना द्यायचे की नव्याने आलेल्यांना, हाही मुद्दा आहे.