Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय

मनपाच्या प्रारुप विकास आराखड्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांचे उच्च न्यायालयात आव्हान

0
Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय
Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय

Ahilyanagar Municipal Corporation : नगर : महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्याला (Draft Development Plan) उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी पुढील तारखेपासून महापालिकेतर्फे भक्कपणे बाजू मांडण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी महासभेत दिली. माजी आमदार दिवंगत अरुणकाका जगताप (Arunkaka Jagtap) यांचा पुतळा गंगा उद्यानजवळच्या चौकात उभारण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.

महापालिकेची महासभा बुधवारी झाली. यामध्ये विविष विषय चर्चेसाठी होते. यातील विकास आराखड्याच्या विषयासंबंधी न्यायालयीन प्रकरणाचा विषय निघाला. मनपाच्या प्रारुप विकास आराखड्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 12 जानेवारी 2027 ला होणार आहे. यावेळी महापालिकेतर्फे बाजू मांडण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर महापौर ज्योती गाडे यांनी यासाठी चांगला वकील नियुक्त करण्याची सूचना केली.

नक्की वाचा : जगातील सर्वात मोठ्या युरॉलॉजी परिषदेत अहिल्यानगरच्या डॉ. स्वानित देशपांडे यांची निवड

Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय
Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय

सावेडीत अरुणकांकाचा पुतळा उभारणार

सावेडीतील गंगा उद्यान चौक येथे दिवंत माजी आमदार अरुणकाका जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. या विषयावर बोलताना नगरसेवक सागर बोरुडे म्हणाले, यासाठीची प्रक्रिया व परवानग्यासाठी वेळापत्रक निश्चित करावे. यासाठी समिती स्थापन करून त्यामार्फत पाठपुरावा करण्यात यावा. नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी त्या चौकाला ‘काका चौक’ नामकरण करण्याची मागणी केली. बाबासाहेब वाकळे यांनी समिती स्थापन करून लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडावी, सुशोभीकरण करावे, चौकाला काकांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे यांनीही सहभाग घेतला. त्यानंतर महापौर ज्योती गाडे यांनी महापौर, उपमहापौर, वाकळे, बारस्कर अशा सर्वांचा समावेश करून समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय
Ahilyanagar Municipal Corporation : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय

इतर विषय़ांवरही झाली चर्चा (Ahilyanagar Municipal Corporation)

महापालिकेकडून पाणीपुरवठा केल्या जात असलेल्या ग्रामपंचायतींकडील थकबाकीचा प्रश्न, वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवड, मृत कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत, माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत प्राप्त बक्षीस रकमेतून महापालिका हद्दीतील प्रस्तावित 4 ठिकाणी उद्याने, अग्निशमन विभागा करिता आधुनिक टर्न टेबल लॅडर यंत्रणा, शहरातील रस्ते पावसाळी पाणी वाहून नेणार्‍या नाल्या, रस्ता दुभाजक पदपथ, वृक्ष लागवड अशा 45 कामांसाठी 488 कोटींचा अंदाजपत्रकीय आराखडा, त्यात मुकुंदनगर, नागापूर, बोल्हेगाव वगळले, सामाजिक न्याय भवन रस्ता विषयावर अ‍ॅट्रॉसिटीच्या धमक्या, नवीन वीज उपकेंद्रासाठी सावेडीत जागा आदी विषयांवर चर्चा झाली.

मुकुंदनगरबद्दल नगरसेवकांचा रोष

या सभेत मुकुंदनगरमधील पथदिव्यांचा प्रश्न तेथील नगरसेवकांनी मांडला. त्यावर सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाले. सुरेश बनसोडे, संपत बारस्कर. प्रकाश भागानगरे यांनी मुकुंदनगरमध्ये कोण जाणार, तिथे कामगारांना मारून टाकतात. मुकुंदनगरच्या नगरसेवकांनी लाइट-पाणी याबाबत मागणी करू नये. तेथे कामगाराचा खून झाला, त्याचा पाठपुरावा का करीत नाहीत, असा प्रतिरप्रश्न त्या नगरसेवकांना केला. त्यानंतर चर्चा तेथेच थांबली.