Republican and Democratic Parties in America : हत्ती विरूद्ध गाढव! रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाची ‘ही’ चिन्हे कशी खास बनली?

0
Republican and Democratic Parties in America : हत्ती विरूद्ध गाढव! रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाची ‘ही’ चिन्हे कशी खास बनली?

नगर :  अमेरिकेच्या २०२६ मधील मध्यावधी निवडणुकीत (2026 U.S. Midterm Elections) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष (Republican and Democratic Parties in America) यांच्यात मुख्य राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. याच २ पक्षांची अमेरिकेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आहे तर डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. ही चिन्हे अमेरिकन राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण तुम्हाला माहित आहे का या पक्षाचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी हीच चिन्हे का निवडण्यात आली? ही चिन्हे कोणत्या राजकीय विचारसरणीशी जोडली? तर यामागे मनोरंजक असा इतिहास (The History Behind Symbols)आहे. वाचा सविस्तर…

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या सरींनी दिला आधार; हरभरा, गव्हाची पेरणी वाढणार

रिपब्लिकन पक्षाचे हत्ती चिन्ह कसं तयार झालं? (Republican and Democratic Parties in America)

मिळालेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती बनवण्याची घटना ७ नोव्हेंबर १८७४ रोजी घडली. थॉमस नॅस्ट या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराने हार्पर वीकली या मासिकात “रिपब्लिकनला मतदान करताना” हत्तीचे चित्रण असलेले व्यंगचित्र प्रकाशित केले होते. नॅस्टने या व्यंगचित्रात रिपब्लिकन पक्षाचे गुणविशेष, म्हणजे सामर्थ्य, स्थिरता आणि भक्कम धोरणांचे प्रतीक म्हणून हत्तीचा वापर केला. हा प्राणी जसा शक्तिशाली असतो, तसाच रिपब्लिकन पक्षही दृढ आहे, असा संदेश देण्याचा नॅस्टचा उद्देश होता. त्यानंतर हे चिन्ह रिपब्लिकन पक्षासाठी लोकप्रिय झाले व  हत्ती हेच रिपब्लिकन पक्षाची ओळख बनले.

अवश्य वाचा : अहिल्यानगर वरून महाबळेश्वरला फिरायला जायचा विचार करताय…कसं जाणार? काय पाहणार?

डेमोक्रॅटिक पक्षाचे गाढव चिन्ह कसं तयार झालं? (Republican and Democratic Parties in America)

गाढवाचे चिन्ह  हे डेमोक्रॅटिक पक्षाशी जोडले गेले. यामागे देखील एक मनोरंजक कथा आहे. त्याच्यामागे अध्यक्षीय उमेदवार अँड्र्यू जॅक्सनशी संबंधित कथा आहे. १८२८ च्या निवडणुकीत जॅक्सनच्या विरोधकांनी त्याला “जॅकस” (गाढव) म्हणत अपमानित केले. मात्र, जॅक्सनने या अपमानास्पद वागणुकीला सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले आणि प्रचारात गाढवाचा वापर केला. १८७० च्या दशकात थॉमस नास्टने आपल्या व्यंग चित्रांमध्ये गाढवाचे रूपक म्हणून वापर सुरूच  ठेवला. त्यामुळे गाढवाचे प्रतिकात्मक महत्त्व वाढले. साधेपणा, कष्टाळूपणा आणि सर्वसामान्य लोकांसाठी असलेली निष्ठा, या गुणांचा गाढवाशी संबंध आहे. यामुळे गाढव हे डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह बनले.

आणि आता हत्ती आणि गाढव ही दोन्ही चिन्हे अमेरिकन राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग बनलेली आहेत. हत्ती हे रिपब्लिकन पक्षाच्या पुराणमतवादी विचारांचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे, तर गाढव डेमोक्रॅटिक पक्षाच्या सामान्य लोकांसाठी असलेल्या निष्ठेचे, पुरोगामी विचारांचे प्रतीक आहे. या चिन्हांनी अमेरिकन राजकारणाला एक विशिष्ट ओळख दिली आहे.