Sugar Factory : ऊस दराची टोलवाटोलवी; कारखानदार म्हणतात, ‘आधी जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट होऊ द्या’

Sugar Factory : ऊस दराची टोलवाटोलवी; कारखानदार म्हणतात, ‘आधी जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट होऊ द्या’

0
Sugar Factory : ऊस दराची टोलवाटोलवी; कारखानदार म्हणतात, ‘आधी जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट होऊ द्या’
Sugar Factory : ऊस दराची टोलवाटोलवी; कारखानदार म्हणतात, ‘आधी जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट होऊ द्या’

Sugar Factory : नगर : जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन वीस दिवसांहून अधिक काळ उलटला आहे. लाखो टन उसाचे गाळपही झाले आहे, मात्र अद्यापही उसाचा अंतिम दर निश्चित न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane Growing Farmers) चिंतेत आहे. एकीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कारखानदारांना ९ नोव्हेंबरपर्यंत उसाचा दर जाहीर करण्याचे आवाहन केले असताना, दुसरीकडे कारखानदारांनी (Sugar Factory) मात्र जिल्हा बँकेकडे बोट दाखवत दराची टोलवाटोलवी सुरू ठेवली आहे.

बँकेच्या भूमिकेकडे कारखानदारांचे डोळे

“आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची साखर कारखान्यांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट होऊ द्या, बँक कारखान्यांना किती प्रमाणात आर्थिक मदत किंवा उचल देणार हे समोर आल्यानंतरच आम्ही दर जाहीर करू,” अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे उसाच्या दराचे भवितव्य आता पूर्णपणे जिल्हा बँकेच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

१२ नोव्हेंबरनंतरच निर्णय स्पष्ट होणार? (Sugar Factory)

सध्या जिल्हा बँकेवर प्रशासकीय राजवट असून, बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया १२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडीनंतरच नवे संचालक मंडळ बँकेचा कारभार अधिकृतपणे हाती घेईल. नव्या संचालक मंडळाच्या स्थापनेनंतरच बँक आपली आर्थिक भूमिका आणि कारखान्यांना मिळणाऱ्या मदतीचे धोरण जाहीर करेल. त्यामुळे १२ नोव्हेंबरनंतरच उसाच्या दराचे पुढील गणित स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


कारखाने सुरू होऊनही दर ठरत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरत असून, आता सर्वांचे लक्ष ९ नोव्हेंबरच्या विखे पाटलांच्या अल्टिमेटमकडे आणि त्यानंतर १२ नोव्हेंबरला होणाऱ्या जिल्हा बँकेच्या घडामोडींकडे लागले आहे. ऊस दरासंबंधी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन तूर्त मिटले असले तरी दर कधी आणि किती जाहीर होतात, यावर पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. सर्व जिल्ह्यांत सारखी परिस्थिती नाही, त्यामुळे सर्वत्र एकच सूत्र अवलंबिता येणार नाही, असेही विखे पाटील म्हणाले आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मी कारखान्याचा अध्यक्ष नाही : विखे पाटील (Sugar Factory)

अहिल्यानगरमध्ये ऊस उत्पादक शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बैठकीत शेतकरी नेत्यांनी मागणी केली की, प्रवरानगरच्या विखे पाटील कारखान्याने पुढाकार घेत जास्तीत जास्त दर जाहीर करावा, त्याची अनुकरण इतर कारखाने करतील. अशी मागणी करून शेतकरी प्रतिनिधींनी विखे पाटील यांच्याकडे लगेच दर जाहीर करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, ‘मी कारखान्याचा अध्यक्ष नाही, जे अध्यक्ष आहेत, त्यांना यासंबंधी निर्णय घ्यायला सांगतो.’