नगर : ऑकलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया जोरदार सराव करत असताना या सरावादरम्यान भारतीय कॅप्टन शुभमन गिलने (Shubman Gill Temple Device) वापरलेलं एक नवीन फिटनेस डिव्हाइस (Fitness device) सध्या क्रीडा विश्वात चर्चेचा विषय ठरलं आहे. हे उपकरण नेमकं काय आहे आणि याचा काय उपयोग आहे, सविस्तर वाचा…
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल जेव्हा न्यूझीलंड मालिकेसाठी सराव करत असताना अचानक चर्चेत आलाय. सरावादरम्यान त्याने दीपिंदर गोयल यांच्या ‘टेंपल’ गॅजेटचा वापर केला. जेनेरेटिव्ह एआय आणि प्रगत न्यूरोसायन्स वर आधारित हे वियरेबल मेंदूतील रक्तप्रवाह, नर्वस सिस्टमच्या हालचाली आणि मानसिक तणाव मोजण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. झोमॅटोचे को-फाउंडर दीपिंदर गोयल यांचा हा एक खाजगी आणि महत्त्वाकांक्षी हेल्थ-टेक स्टार्टअप आहे.
नक्की वाचा : हत्ती विरूद्ध गाढव! रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाची ‘ही’ चिन्हे कशी खास बनली?
Temple Device नेमकं काय? (Shubman Gill Temple Device)
१. ब्रेन-मॉनिटरिंग वियरेबल: हे इतर सामान्य स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडसारखे डिव्हाईस नाही जे मनगटावर बांधले जातात. हे एक लहान, पेबल-आकाराचे गॅजेट आहे जे मेडिकल-ग्रेड ॲडेसिव्ह टेपच्या मदतीने थेट कानाजवळ चिकटवले जाते.
२. ब्रेंनफ्लो तंत्रज्ञान: यात प्रगत ऑप्टिकल सेन्सर्स आहेत, जे मेंदूतील रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनची पातळी सतत ट्रॅक करतात.
३. एन्ट्रॉपी स्कोर: हे डिव्हाइस ‘१ ते २५०’च्या स्केलवर एक स्कोर देते, ज्यावरून माणसाला जिवंत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या किती ताण सहन करावा लागत आहे, हे मोजले जाते.
४. इतर फीचर्स: हे केवळ व्यायामच नाही, तर शरीराची हालचाल, बसण्याची-उठण्याची पद्धत आणि जेवताना अन्न चावण्याची प्रक्रियाही ट्रॅक करू शकते.
अवश्य वाचा : ‘अबीर’मधील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं’ गाण्यात मानसीच्या लावणीचा ठसका;चित्रपटात अहिल्यानगरचे कलाकार झळकणार

‘TEMPLE Device’ हे फक्त डोळ्याच्या बाजूला चिकटवावे लागते. या गॅझेटमध्ये पीपीजी (फोटोप्लेथाइस्मोग्राफी) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान त्वचेवर विशिष्ट प्रकाशाचा किरण टाकून रक्तातील सूक्ष्म बदलांची अचूक नोंद घेते. हे उपकरण अत्यंत कमी पॉवरवर काम करते. गोळा केलेला सर्व डेटा डिव्हाइसमधील इनबिल्ट सिस्टीमद्वारे त्वरित विश्लेषित केला जातो आणि ब्लूटूथद्वारे थेट खेळाडूच्या किंवा प्रशिक्षकाच्या मोबाईल ॲपवर दिसतो. यामुळे सरावादरम्यान गिलची एकाग्रता आणि फिटनेस लेव्हल समजण्यास मदत होत होती, असं देखील सांगितले जात आहे
शुभमन गिल आणि पीव्ही सिंधूने का वापरले? (Shubman Gill Temple Device)
न्यूझीलंड मालिकेपूर्वी ऑकलंडमध्ये सरावादरम्यान शुभमन गिलने हे डिव्हाइस परिधान केले होते. यापूर्वी स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही ऑगस्टमधील वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान याची चाचणी घेतली होती. उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सामन्यादरम्यान येणारा मानसिक ताण, मेंदूची थकवा पातळी आणि अचूक रिकव्हरी मोजण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शुभमन गिलने देखील सध्या हे डिव्हाईस वापरल्याच दिसलं आहे.
AIIMS आणि इतर प्रमुख न्यूरोसर्जनच्या मते, हे डिव्हाइस डोक्याच्या त्वचेवरील रक्तवाहिन्यांचा डेटा ट्रॅक करते, त्यामुळे याला ‘Experimental Wellness Tracker’ (वेलनेस ट्रॅकर) मानले जावे, कोणताही अधिकृत वैद्यकीय आजार निदान करणारे साधन याला समजले जाऊ नये.



