
Three Kabaddi players honored : नगर : अहमदाबाद (गुजरात) येथे २३ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत (Commonwealth Kabaddi Championship) भारतीय पुरुष आणि महिला संघाने सुवर्णपदक पटकावत देशाचा नावलौकिक वाढवला. या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनीही आपल्या दमदार कामगिरीने विशेष छाप पाडली. विशेष म्हणजे, हे तिन्ही खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्यातील असून शिवम पठारे, आदित्य शिंदे आणि अजित पवार अशी त्यांची नावे आहेत.

खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
या तिन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा आज (ता. ९) जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात (Three Kabaddi players honored) आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा अभिमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खेळाडूंना सुविधा देण्यासाठी प्रशासन सकारात्मक (Three Kabaddi players honored)
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी, अहिल्यानगर जिल्ह्यात कबड्डीसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये अधिकाधिक गुणवंत खेळाडू घडावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. खेळाडूंना योग्य सुविधा, प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक स्तरावर चमकणारे खेळाडू जिल्ह्यातून घडत असल्याने क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब असून, या यशामुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे उपस्थित होते.


