Fire At A Firecracker Stall : श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव येथे दिवाळीच्या (Diwali) संध्याकाळी एका फटाक्यांच्या स्टॉलला (Firecracker Stall) अचानक भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. स्थानिक युवकांच्या प्रसंगावधानामुळे व धाडसामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र या दुर्घटनेत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
नक्की वाचा : दिवाळीचा गोडवा वंचित विद्यार्थ्यांसोबत; भिंगार प्रेस क्लबचा सामाजिक उपक्रम
परिसरात धावपळ
मिळालेल्या माहितीनुसार, कोळगाव बस स्थानकासमोरील सैनिक चौकात बापूसाहेब कर्डीले यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी विक्रीसाठी फटाके आणले होते आणि भाजीपाला दुकानासमोरच फटाक्यांचा स्टॉल लावला होता. दिवाळीच्या दिवशी (लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी) सात वाजण्याच्या सुमारास अचानक या फटाक्याच्या स्टॉलला आग लागली. यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील तरुण तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जीवाचा धोका पत्करून प्रसंगावधान राखले आणि तातडीने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दुकान बंद केल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले (Fire At A Firecracker Stall)
या वेळी शेजारील घोंगडे यांच्या दुकानातील फटाके तातडीने बाजूला काढण्यात आले. शेजारीच असलेल्या राहुल चंदन यांचे कपड्यांचे दुकानात उडालेल्या रॉकेटचा बार झाला मात्र त्यांनी तातडीने हालचाल करत दुकान बंद केल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. त्या सोबतच सरपंच पुरुषोत्तम लगड, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बारहाते, महेश कुलथे, सागर नलगे, सतीश उजगरे, स्थानिक युवकांच्या या सतर्कतेमुळे आणि धाडसी कामगिरीमुळे आग आजूबाजूच्या इतर दुकानांपर्यंत पसरली नाही. अन्यथा, परिसरातील १० ते १२ दुकाने जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले असते. या दुर्घटनेत फटाक्यांच्या स्टॉलचे व साहित्याचे मिळून अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.



