Indefinite Rasta Roko Protest : ऊस दरासाठी राहुरीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरु; वाहतुकीची प्रचंड कोंडी

पहिली उचल ही चार हजार रुपये दिलीच पाहिजे अशी सर्व शेतकरी संघटनांची मागणी

0
Indefinite Rasta Roko Protest : ऊस दरासाठी राहुरीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरु; वाहतुकीची प्रचंड कोंडी
Indefinite Rasta Roko Protest : ऊस दरासाठी राहुरीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरु; वाहतुकीची प्रचंड कोंडी

Indefinite Rasta Roko Protest : राहुरी: ऊसाला (sugarcane) 4000 रुपये पहिला हप्ता मिळावा व उसाचा भाव जाहीर करावा, या मागणीसाठी आज (ता.९) सर्व शेतकरी संघटनांनी राहुरी येथे नगर-मनमाड महामार्ग (Nagar-Manmad Highway) रोखून धरला आहे. सकाळी 11 वाजता सुरू झालेले बेमुदत रास्ता रोको आंदोलनात (Indefinite Rasta Roko Protest) जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत कार्यरत आहे. जड वाहतूकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर प्रवासी वाहनांना राहुरी शहरातून नव्या पेठेतून बालाजी मंदिराचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, दोन्ही बाजूंच्या वाहनांसाठी शहरातीलच मार्ग उपलब्ध झाल्याने शहरात मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.

राहुरीतील सर्व शेतकरी संघटनांनी आजपासून नगर मनमाड महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू केले .गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरीही अद्याप भाव जाहीर झालेला नाही. साखरेचे विक्रीचे दर 40 रुपये असताना 3100 पहिली उचल दिली गेली होती तर आज साखरेचे भाव 50 ते 55 रुपये किलो आहेत .त्या प्रमाणात आम्हाला एक हजार रुपयांनी आगाऊ रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही .शेतकऱ्यांच्या मागे पाठीशी भक्कम पण उभे राहणार आहे असे शासन सातत्याने सांगते आहे.

नक्की वाचा : पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपशावरून संघर्ष पेटला; ग्रामस्थांचा रास्ता रोको

अद्याप भाव जाहीर नाही

प्रत्यक्षात उसाचा हंगाम सुरू होऊनही साखर कारखानदारांनी अद्याप भाव जाहीर केलेला नाही. पहिली उचल ही चार हजार रुपये दिलीच पाहिजे अशी सर्व शेतकरी संघटनांची मागणी आहे. कोल्हापुरात जर 3900 रुपये पहिली उचल जाहीर होते तर या भागातील शेतकऱ्यांनाही चार हजार रुपये द्यावा अशी मागणी रवींद्र मोरे यांनी केली. दिवसभर आंदोलकांसमोर अनेकांची भाषणे झाली. त्यामध्ये राजेंद्र लोंढे, ॲड. अजित काळे, प्रकाश देठे, जितेंद्र भोसले ,विठ्ठल शेळके, संजय पोटे ,दिलीप इंगळे ,नितिन पटारे,अबादास कोरडे, ॲड. नितिन पानसरे, बाळासाहेब जाधव, सुरेश ताके आदींची भाषणे झाली. आंदोलकांनी टाळ मृदंग पेटी ढोल यावर अनेक भजने गायली.आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.आंदोलकांनी रस्त्यावरच आज दुपारी जेवण घेतले .त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण विशेष गाड्यांमधून आणण्यात आले होते. रस्त्यावरच बसून आंदोलकांनी जेवण केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सरकारवर टीका (Indefinite Rasta Roko Protest)

आंदोलकांनी सरकारच्या निषेध च्या घोषणा दिल्या. हा प्रश्न केवळ साखर कारखानदार व ऊस उत्पादक यांच्यातील नसून राज्य सरकारने यात मध्यस्थी केलीच पाहिजे असे प्रकाश देठे यांनी आवाहन केले. दिवाळीसाठी पाच हजार रुपयाची मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे आमच्या एका टनाचा भाव आजचा हजार रुपये पेक्षा जास्त आहे आणि पाच हजार रुपयाचे मदत करून सरकारने शेतकऱ्यांचे श्रेष्ठ केल्याची टीका सरकारवर करण्यात आली तहसीलदार अमित पवार व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आंदोलकांचे चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले दिवसभर त्यांनी आज रास्ता रोको मध्ये रस्ता अडवून ठेवला आहे 

संध्याकाळी भजन किर्तनाला आंदोलन स्थळी प्रारंभ झाला आहे.वंचित चे नगरसेवक संतोष चोळके,पिंटू नाना साळवे यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.आंदोलकांनी महामार्गावर मंडप टाकलेला होता.या मंडपात त्यांनी दुपारी जेवण घेतले.