Rasta Roko Movement : पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपशावरून संघर्ष पेटला; ग्रामस्थांचा रास्ता रोको

तलाव परिसरात चर खोदले; नगर-वांबोरी रस्त्यावर ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

0
Rasta Roko Movement : पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपशावरून संघर्ष पेटला; ग्रामस्थांचा रास्ता रोको
Rasta Roko Movement : पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपशावरून संघर्ष पेटला; ग्रामस्थांचा रास्ता रोको

Rasta Roko Movement : नगर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद होत असताना पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपशावरून आता प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. तलावातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी अहिल्यानगर महापालिका आणि तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या महापालिकेच्या (Municipal Corporation’s) भरारी पथकाने धडक कारवाई केली. अवैध पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाईपलाईन आणि विद्युत पंपावर कारवाई करण्यात आली, तर भविष्यातही पाणी उपसा होऊ नये यासाठी तलाव परिसरात चक्क चर खोदण्यात आले. मात्र, या कारवाई विरोधात पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा आणि डोंगरगण परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी थेट नगर-वांबोरी रस्त्यावरील (Nagar-Vambori Road) पिंपळगाव माळवी तलावाजवळ रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले.

नक्की वाचा : मांजरसुंबा येथे शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात; चारा व्यवस्थापन व पशुखाद्याबाबत मार्गदर्शन

स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने पाणी उपसा बंद करावा. मात्र, पाईपलाईन जेसीबीच्या साह्याने तोडू नये, हा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या नाराजीचा उद्रेक रस्त्यावर पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाल्याने नगर-वांबोरी रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महापालिकेच्या भरारी पथकाचा इशारा (Rasta Roko Movement)

दरम्यान, पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा आणि डोंगरगण परिसरातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. तलावातील पाण्याच्या वापरावरून निर्माण झालेला हा वाद आता चांगलाच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, पिंपळगाव माळवी तलावातून कोणत्याही प्रकारे अवैध पाणी उपसा करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून पाणी उपसा करताना कोणी आढळल्यास संबंधितांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही महापालिकेच्या भरारी पथकाने दिला आहे.