
Farmers’ Honor Ceremony : नगर : वाढत्या महागाईच्या काळात दूध व्यवसाय (Dairy Business) टिकवून ठेवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) जनावरांचे योग्य संगोपन, संतुलित आहार आणि दुधाची गुणवत्ता याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दुधाचे उत्पादन (Production) वाढवतानाच त्याचा दर्जा टिकवणे आणि उत्पादन खर्च कमी ठेवणे, हीच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेची गुरुकिल्ली आहे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
नक्की वाचा : कुकाण्यातील चिलेखनवाडीत दुकानांना आग; आमदार विठ्ठल लंघे यांच्याकडून पाहणी
दुधाची गुणवत्ता सातत्याने चांगली ठेवणे महत्त्वाचे
अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे चैतन्य गोरक्षनाथ दूध संकलन केंद्राच्या वतीने आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना दूध उत्पादक शेतकरी जयवंत ताकटे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले. दूध व्यवसायात केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही, तर दुधाची गुणवत्ता सातत्याने चांगली ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी जनावरांचे आरोग्य, योग्य आहार आणि नियमित देखभाल यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जनावरांच्या आरोग्याची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन (Farmers’ Honor Ceremony)
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी कैलास कदम यांनी चारा व्यवस्थापन, पशुखाद्याचे योग्य नियोजन आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर, संतुलित खाद्य आणि शास्त्रीय पद्धतीने जनावरांचे संगोपन केल्यास दूध उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादनात सुधारणा करता येते, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला चैतन्य गोरक्षनाथ दूध संकलन केंद्राचे संचालक जयराम कदम, बाळासाहेब कदम, मच्छिंद्र कदम, विलास भुतकर, रामदास कदम, प्रशांत कदम यांच्यासह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना दूध व्यवसायातील आधुनिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


