Fire At shops : कुकाण्यातील चिलेखनवाडीत दुकानांना आग; आमदार विठ्ठल लंघे यांच्याकडून पाहणी

चिलेखनवाडी येथील बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुलातील पाच दुकानांना आग लागून मोठे नुकसान

0
Fire At shops : कुकाण्यातील चिलेखनवाडीत दुकानांना आग; आमदार विठ्ठल लंघे यांच्याकडून पाहणी
Fire At shops : कुकाण्यातील चिलेखनवाडीत दुकानांना आग; आमदार विठ्ठल लंघे यांच्याकडून पाहणी

Fire At shops : नगर : नेवासा तालुक्यातील कुकाणा (Kukana) गावातील चिलेखनवाडीत काल (ता. ९) रात्री दुकानांना आग (Fire At shops) लागली. यात दुकानांतील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल लंघे (Vitthal Langhe) यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुकानदारांची विचारपूस केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

नक्की वाचा : कोळगावात फटाक्यांच्या स्टॉलला आग लागून ५ लाखांचे नुकसान

मोठे नुकसान

चिलेखनवाडी येथील बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुलातील पाच दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये नंदू सरोदे, योगेश राजेंद्र सावंत, मयूर सुभाष फोलाने, प्रवीण गायकवाड आणि अण्णासाहेब पाडाळे या व्यापाऱ्यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना (Fire At shops)

या घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी आमदार विठ्ठल लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार बोरुडे, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.