नगर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचं ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love Book) हे पुस्तक प्रचंड गाजतं आहे. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते आजपर्यंतच्या राजकीय घडामोडींचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. तसेच या पुस्तकात प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या आंदोलनावरही भाष्य करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वातील सरकार गेलं होतं. या आंदोलनाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचा छुपा पाठिंबा होता. संघ आणि भाजपानेच हे आंदोलन घडवून आणलं आणि त्याला रसदही पुरवली होती, असा दावाच सोनिया गांधी यांनी या पुस्तकात केलाय. अण्णा हजारेंनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
नक्की वाचा : शुभमन गिलने कपाळाजवळ लावलेलं Temple डिव्हाइस नेमकं काय? ते काय काम करतं?
अण्णा हजारे काय म्हणालेत? (Sonia Gandhi)
२०१२ मध्ये अण्णा हजारेंच्या नेतृत्वात जे आंदोलन करण्यात आलं त्याला संघ आणि भाजपाचा छुपा पाठिंबा होता असा दावा सोनिया गांधींनी केला. त्यावर अण्णा हजारेंनी उत्तर दिलं आहे. “जो दावा केला गेला आहे तो चुकीचा आहे. भाजप, आरएसएस यांचा आणि माझा काही संबंध नाही. जे काही करायचं ते देशासाठी हेच माझं ध्येय होतं. मनमोहन सरकार गेलं हे सोनिया गांधी म्हणत असतील तर त्याचा आधार काय? जबाबदार असलेल्या माणसांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, मोघमपणे बोललं तर अंगलट येतं. त्यातून आपली इमेज कमी होते.” असं म्हणत सोनिया गांधी यांनी केलेले आरोप अण्णांनी फेटाळून लावलेत.
अवश्य वाचा : हत्ती विरूद्ध गाढव! रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाची ‘ही’ चिन्हे कशी खास बनली?
२०१२ च्या आंदोलनात नेमकं काय घडलं? (Sonia Gandhi)
अण्णा हजारे यांनी २०१२ मध्ये दिल्लीत ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ नावाचं आंदोलन केलं होतं. अण्णा हजारे हे या आंदोलनाचा ते चेहरा होते. लोकपालाची नियुक्ती आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी हे आंदोलन झालं होतं. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या आंदोलनामुळे काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारवर राजकीय दबाव आला होता, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच हे आंदोलन मिटावं म्हणून केंद्रात तेव्हा मंत्री असलेल्या विलासराव देशमुखांना शिष्टाई करावी लागली होती. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन १० नोव्हेंबरला झालं. मागील तीन ते चार दिवसांपासून या पुस्तकातले प्रसंग चर्चेत आले आहेत. आता सोनिया गांधींनी जो आरोप केला होता तो आरोप अण्णा हजारेंनी फेटाळून लावला आहे.
सोनिया गांधींनी लिहिलेल्या या पुस्तकात काही चुका देखील असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या पुस्तकातील चुकांचे स्क्रीनशॉट आणि पानांची छायाचित्रे शेअर करत सोनिया गांधी यांच्या दाव्यांवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. एकंदरीतच काय तर सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखामुळे अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या राजकीय पार्श्वभूमीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, या वादात थेट भूमिका घेण्याऐवजी अण्णा हजारेंनी समाज आणि देशासाठी काम करत राहण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.



