
Freedom Fighter Senapati Bapat : पारनेर : थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक (Social Reformer) आणि मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती पांडुरंग महादेव बापट यांची १४६ वी जयंती पारनेर येथील स्वातंत्रसैनिक सेनापती बापट (Freedom Fighter Senapati Bapat) स्मारक येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या या क्रांतिकारकाला पारनेर ग्रामस्थ आणि नगरपंचायत प्रशासन मार्फत अभिवादन करण्यात आले.
खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
यावेळी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सेनापती बापट यांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी प्रियांका शिंदे, नगरसेवक योगेश मते, अर्जुन भालेकर, सुभाष शिंदे, नगरसेवक भूषण शेलार, माजी नगरसेवक विशाल शिंदे,विजय डोळ, अमित जाधव,गणेश कावरे, बाळासाहेब शेटे, संदीप सोनवणे, घोडके शेठ, नगरपंचायत प्रशासन कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘मुळशी सत्याग्रहाचे नायक’ (Freedom Fighter Senapati Bapat)
सेनापती बापट यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० रोजी झाला. ब्रिटिशांविरोधात लढणारे ते पहिले मराठी क्रांतिकारक होते. आयर्लंडमध्ये जाऊन लष्करी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. १९२१ मध्ये पुण्याजवळील मुळशी धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने घेतल्या जात होत्या. त्या विरोधात बापटांनी अहिंसक सत्याग्रह उभारला आणि “मुळशी सत्याग्रहाचे नायक” म्हणून ओळख मिळवली. या लढ्यामुळे त्यांना “सेनापती” ही पदवी जनतेकडून मिळाली.
केवळ राजकीय लढाच नाही तर सामाजिक सुधारणांसाठीही त्यांनी आयुष्य वेचलं. अस्पृश्यता निवारण, दारूबंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने रस्त्यावर उतरले. साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी यासाठी ते प्रसिद्ध होते. तुरुंगवास भोगला, पण कधीही तत्वांशी तडजोड केली नाही.सेनापती बापट हे केवळ इतिहासातील नाव नाहीत. ते आजच्या काळातही सामान्य माणसाला अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद देतात. त्यांनी सांगितले होते की, “स्वातंत्र्य मिळाल्यावरही जर गरीब उपाशी राहिला तर ते खरे स्वातंत्र्य नाही.” आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार अंगीकारून समाजसेवेचे व्रत घ्यावे, “सेनापती बापट की जय” च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.


