State-level Kho-Kho Tournament : पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप

State-level Kho-Kho Tournament : पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप

0
State-level Kho-Kho Tournament : पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप
State-level Kho-Kho Tournament : पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप

४० वर्षांनंतर अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा थरार; ४८ संघांचा सहभाग, चार मैदानांवर रंगणार सामने

State-level Kho-Kho Tournament : नगर : मोबाईलच्या वाढत्या आकर्षणामुळे आजची तरुण पिढी मैदानापासून दूर जात आहे. मुलांनी मोबाईलमध्ये वेळ घालवण्याऐवजी मैदानावर येऊन खेळात सहभाग घ्यावा. खेळातून केवळ उत्तम खेळाडूच नव्हे, तर सक्षम व्यक्तिमत्त्व घडते. तसेच खेळाडूंना शासकीय सेवेत जाण्याचीही संधी मिळते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले.

स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

अहिल्यानगरमध्ये ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्यस्तरीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे (State-level Kho-Kho Tournament) आयोजन करण्यात आले आहे. ६२ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी नगरसेवक निखिल वारे, खोखो जिल्हा संघटनेचे विश्वास आठरे पाटील, गौरव पितळे, छत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थोरात, श्वेता गवळी, सुनील जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, संजय धोपावकर, जिल्हा ऑलम्पिक संघटनेचे सचिव शैलेश गवळी, खोखो असोसिएशन क्रीडा संघटनेचे सचिव विकास परदेशी, एकलव्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गोकुळ काळे, आदींसह उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

४८ संघ सहभागी होणार (State-level Kho-Kho Tournament)

या स्पर्धेत राज्यातील पुरुषांचे २४ आणि महिलांचे २४ असे एकूण ४८ संघ सहभागी होणार असून, सुमारे ७२० खेळाडूंसह प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच आणि तांत्रिक समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी चार मैदाने तयार करण्यात येणार असून, दिवसा आणि विद्युत रोषणाईत रात्रीही सामने खेळविले जाणार आहेत. सुमारे तीन ते चार हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था, खेळाडूंच्या निवास व भोजनाची सोय तसेच जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आकाशवाणी, यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरूनही सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.


नगर जिल्ह्याला खो-खो खेळाची मोठी परंपरा आहे. निर्मलचंद्र थोरात आणि श्वेता गवळी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या परंपरेचा गौरव करताना थोरात साहेबांनी अनेक खेळाडू घडविल्याचे जगताप यांनी नमूद केले.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ५१ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला असून, आगामी काळात जिल्ह्यात क्रीडा सुविधांना चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


अहमदनगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य क्रीडा मंडळ, निर्मलनगर या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. उद्घाटनाला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असून, समारोप व पारितोषिक वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.