Sangram Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण वर आमदार संग्राम जगतापांची सूचक प्रतिक्रिया

0
Sangram Jagtap
Sangram Jagtap

Sangram Jagtap | नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या जोमात आहे. यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांशी चर्चा केल्याची कळत आहे. या संदर्भात पत्रकारांनी आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांना विचारना केली असता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले.

हे वाचा – पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप

विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण ( Sangram Jagtap )

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असताना माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शरद पवारांनी १० नोव्हेंबरनंतर बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज (ता. १३) आमदारांशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावर आमदार संग्राम जगताप म्हणाले, पक्ष विलीनीकरणाच्या बातम्या टिव्ही चायनलच्या माध्यमातून आम्हाला समजत आहेत. या संदर्भात मी इतर आमदारांशी संपर्क केला. कोणत्याही आमदाराला उपमुख्यमंत्र्यांचे फोन आलेले नाहीत. विलीनीकरणाच्या चर्चा या केवळ टिव्ही चायनलच्या माध्यमातून सुरू आहेत. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वरिष्ठ पातळीवरील निर्णय महत्त्वाचे ( Sangram Jagtap )

ते पुढे म्हणाले की, आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कुठल्याही आमदाराशी चर्चा झालेली नाही. ज्यावेळी दोन पक्ष वेगळे झाले त्यावेळी आम्हाला कोणी विचारले नाही तर आता कोण विचारणार आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात त्यानुसार काम होत असते. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेच्या विभाजनाच्या वेळी ज्यांना जसे वाटेल तसे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. अजित पवार यांनी निर्णय घेतल्यावर आमदार, खासदार व पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले. चार-दोन वरिष्ठ मंडळी बसून निर्णय घेतात. त्यानुसार पुढील फळीतील नेते व कार्यकर्ते त्यांच्या बरोबर जातात. वरिष्ठ पातळीवरील निर्णयानुसार सर्वांना वागावे लागते, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर ( Sangram Jagtap )

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर भाष्य केले. यात त्यांनी केलेल्या टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, राऊत साहेबांनी त्यांच्या पक्षावर बोलले पाहिजे. त्यांच्या पक्षातील लोक फुटले त्यावेळी त्यांना कळाले नाही आणि ते आमच्या पक्षातील अंतर्गत निर्णयावर बोलत आहे, असे टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here