नगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसताना दिसत आहे. मदर डेअरी, अमूल नंतर आता गोकुळ दुधाच्या दरातही वाढ (Gokul Milk Price Hike) होणार आहे. गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोकुळचे नूतन चेअरमन राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी तसे संकेत दिले आहेत. उद्या (ता. १४) होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत दूध दर वाढ करण्याचा निर्णय (Decision to increase milk prices) होणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा : महागाईचा भडका! आरबीआयची कमाल मर्यादा ओलांडून किरकोळ महागाई पोहोचली ६.९ टक्क्यांवर
दोन दिवसांपूर्वी अमूलने त्यांच्या दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यानंतर आता गोकुळनेही दूध दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमुलने दूध विक्री दरात वाढ केल्याने गोकुळ देखील विक्री दर वाढवणार असल्याचं अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. दुधाच्या विक्री दरात वाढ केल्यानंतर दूध उत्पादकांना देखील दर वाढवून द्यावा लागणार आहे. तसे प्रयत्न आम्ही करणार असल्याचं गोकुळचे चेअरमन राजेश पाटील यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : रिंकू राजगुरूच्या नजरेतून दिसणार स्त्रीच्या संघर्षाची नवी कहाणी; ‘जिजाई’चा ट्रेलर प्रदर्शित!
दुधाच्या दरात किती वाढ? (Gokul Milk Price Hike)

अमूलनं आपल्या दूधाच्या दरात २ ते ४ रूपयांची वाढ केली आहे. १२ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू झाली आहे. अमूल ताजा टोण्ड दूध २ रूपयांनी तर अमूल गोल्ड दूध ४ रूपयांनी महागलं आहे. तर मदर डेअरीच्या दूध किमतीही २ ते ४ रूपयांनी वाढल्या आहेत.
दुधाच्या दरात वाढ का? (Gokul Milk Price Hike)
अमूल दुधाच्या दरातील ही अचानक वाढ देशातील वाढत्या महागाईमुळे झाली असल्याची माहिती आहे. हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्य आणि पॅकेजिंगच्या किमती वाढत आहेत. मालवाहतुकीच्या खर्चातील वाढ हे देखील एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांनी आता दुधाचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर मोठा भार पडणार आहे.



