निवडुंगे पुलावरील ४६ हजारांच्या ४२ लोखंडी प्लेटा गायब; शंकरवाडीतून ८० हजारांची मोटारसायकल चोरीला
Theft : पाथर्डी : तालुक्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. निवडुंगे येथील पुलाच्या कामासाठी ठेवलेल्या ४६ हजार २०० रुपये किमतीच्या ४२ लोखंडी सेंट्रींग प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून (Theft) नेल्या. तर शंकरवाडी येथून ८० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास (Two-wheeler theft) केली.
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल
या दोन्ही घटनांप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत डागेवाडी येथील राजेंद्र भागचंद आकोलकर यांचे निवडुंगे येथील पुलावर बांधकामाचे काम सुरू आहे. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता कामाच्या ठिकाणी भेट दिली असता सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटा तेथे होत्या. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मजुरांसह कामावर गेले असता त्यांना ४२ निळ्या रंगाच्या लोखंडी सेंट्रींग प्लेटा गायब असल्याचे दिसून आले. परिसरात शोध घेऊनही प्लेटा मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
४६ हजार २०० रुपये किंमतीच्या प्लेटांची चोरी (Theft)
चोरीस गेलेल्या प्लेटांची किंमत ४६ हजार २०० रुपये आहे. दुसऱ्या घटनेत शंकरवाडी येथील कैलास बाळासाहेब जाधव यांच्याकडे मित्र अनिकेत कैलास जाधव याची मोटारसायकल (क्रमांक एमएच १७ डीएस ४७०३) होती. ५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास कैलास जाधव यांनी ही दुचाकी घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पाहिले असता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. मित्रासह परिसरात शोध घेतला, मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.



