Fodder Shortage | अहिल्यानगरमध्ये गरजेच्या निम्माच चारा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पुढील दोन महिने बंदी

0

Fodder Shortage | नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाई ( Fodder Shortage ) लक्षात घेता, जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा व कोरडा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टी.एम.आर.) जिल्ह्याबाहेर नेण्यास पुढील दोन महिन्यांसाठी सक्त बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल (ता. १७) हे आदेश दिले. 

नक्की वाचा : थोरात कारखान्याची ३२०० रुपयांची पहिली उचल अमान्य; शेतकरी नेते आक्रमक

जिल्ह्यातील पशुधन ( Fodder Shortage )

जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सध्या अल्प चारा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात एक लाख ७९ हजार ९८७ लहान जनावरे, १३ लाख १९ हजार ९०६ मोठी जनावरे आणि १४ लाख ९९ हजार ८९३ शेळ्या व मेंढ्या असे एकूण २६ लाख १५ हजार ७०६ पशुधन आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चाऱ्याचा तुटवडा ( Fodder Shortage )

टंचाईच्या निकषानुसार या सर्व पशुधनासाठी दरमहा आठ लाख ९५ हजार २४३ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. मात्र, खरीप हंगामातील पेरणीनुसार जिल्ह्यात सध्या चार लाख ५४ हजार १८९ मेट्रिक टन इतकेच चारा उत्पादन झालेले आहे. दरमहा लागणाऱ्या चाऱ्याच्या तुलनेत उपलब्ध साठा पाहता, जिल्ह्यात चार लाख ४१ हजार ५४ मेट्रिक टन इतक्या चाऱ्याचा तुटवडा भासणार आहे. 

जिल्ह्यात चाऱ्याची मोठी कमतरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कालपर्यंत (ता. १६) चारा वाहतूक बंदी लागू होती, ती आता या नवीन आदेशाच्या तारखेपासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कायम राहणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सर्व तालुका व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here