नगर : महाराष्ट्रात सध्या बऱ्याच ठिकाणी थंडीचा तडाखा वाढला आहे. तर कुठे दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. अशातच बंगालच्या उपसागरात शक्तिशाली अक्वान चक्रीवादळ (Cyclone Akvan) तयार होण्याची शक्यता असून, २० नोव्हेंबरच्या रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ते धडकण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम (Impact on Maharashtra) होणार नसला तरी राज्यातील हवामानावर त्याचा प्रभाव काही प्रमाणात जाणवू शकतो. मात्र हे चक्रीवादळ निर्माण होण्याचे कारण (The cause of cyclone formation) नेमकं काय आणि त्याचा काय परिणाम घेऊ शकतो. हे वाचा…
नक्की वाचा : क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने मोठी झेप; मृत्यूदरात ३८ टक्क्यांची घसरण!
बंगालच्या खाडीत सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळाच्या रूपात होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग हा ताशी १४५ किलोमीटर राहणार आहे. ‘अर्णब आणि मुरसू या चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे तिसरे चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाला अक्वान हे नाव देण्यात आले आहे.
अवश्य वाचा : पुण्यातील शिवाजीनगर आगाराची मोठी झेप! १६७ बसेसचा ७० हजार १९२ किलोमीटरचा प्रवास
चक्रीवादळाची सध्याची स्थिती काय आहे? (Cyclone Akvan)

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि लगतच्या नैऋत्य भागात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील काही दिवसांत वायव्य दिशेने प्रवास करताना ही प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झाल्यानंतर आज १७ नोव्हेंबर रोजी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात ते अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर गंभीर चक्रीवादळात’ होईल. त्यानंतरच्या दोन दिवसांत ते अधिक तीव्र होत वायव्य दिशेने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकेल. १८ नोव्हेंबरपर्यंत ते जमिनीच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले.
अक्वान हे नाव कसे पडले? (Cyclone Akvan)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचे नाव अनोखे आहे. अक्वान हे नाव उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या अधिकृत नामकरण यादीत इराणने सुचवलेल्या नावांपैकी एक आहे. या नावाचा संबंध पर्शियन पौराणिक कथा आणि इराणच्या साहित्यिक परंपरेशीही आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रासह उत्तर हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नाव देण्याची जबाबदारी भारतीय हवामान विभागाकडे असते. प्रादेशिक नामकरण प्रणालीअंतर्गत इराणने सादर केलेल्या यादीत ‘अक्वान’ या नावाचा समावेश करण्यात आला आहे. कवी फिरदौसी यांनी लिहिलेल्या शाहनामा या प्रसिद्ध पर्शियन महाकाव्यात अक्वान-ए-दिव’ नावाचे एक राक्षसासारखे पात्र येते. त्याच्यात आणि पर्शियन महानायक रुस्तम यांच्यात युद्ध होते आणि रुस्तम हा अक्वानचा वध करतो, अशी कथा आहे. चक्रीवादळ राक्षसारखेच काम करत असल्याने इराणने त्याला अक्वान हे नाव दिलय.
चक्रीवादळाचा कोणत्या राज्यांवर परिणाम? (Cyclone Akvan)
अक्वान हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम पूर्व किनारपट्टीवरील इतर राज्यांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, अंदमान निकोबार व झारखंड या राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागांत राहणाऱ्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनाही परत किनाऱ्यावर परतण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंड हे राज्य किनारपट्टीवर येत नसले, तर त्या राज्यातही चक्रीवादळाचा परिणाम होऊन वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.



