Demand for removal of encroachment | महांडूळवाडी तलावातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशीही आंदोलन

0

Demand for removal of encroachment | नगर : श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथील पाझर तलावातील कथित अतिक्रमणे हटवावीत ( Demand for removal of encroachment ) आणि तलावाची शासकीय मोजणी करावी, या मागणीसाठी पावन फाउंडेशन आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा : थोरात कारखान्याची ३२०० रुपयांची पहिली उचल अमान्य; शेतकरी नेते आक्रमक

अनधिकृतपणे विहिरी खोदल्याचा आरोप ( Demand for removal of encroachment )

महांडूळवाडी येथील पाझर तलावात काही धनदांडग्या व्यक्तींनी अनधिकृतपणे विहिरी खोदल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकारामुळे तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम होत असून परिसरातील भूजलपातळी खालावत असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या श्रीगोंदा तालुक्यात पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवत असताना अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शासकीय मोजणी करण्याचे नियोजन ( Demand for removal of encroachment )

या कथित अतिक्रमणांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, पाझर तलावाची शासकीय मोजणी करण्याचे नियोजन होते. मात्र, एका आमदाराच्या दबावामुळे ही मोजणी केली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

तलावाची निष्पक्ष शासकीय मोजणी करून अतिक्रमणे निश्चित करावीत आणि त्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते श्याम जरे यांनी दिला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here