
Panand Raste Yojana : नगर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सुलभ आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने (Revenue Department) मोठी मोहिम हाती घेतली आहे. राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’अंतर्गत (Panand Raste Yojana) अहिल्यानगर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ५८१ रस्त्याच्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी २१२ पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ६० रस्त्यांच्या वर्क ऑर्डर (Work Order) देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कर्जत-जामखेड, अकोले आणि नेवासा या तालुक्यांमध्ये पाणंद रस्ता निर्मितीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर श्रीरामपूर आणि अहिल्यानगर शहरात क्लस्टर निर्मिती आणि तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांचे काम पूर्ण झाले आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुलांसाठी मोफत पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण
जिल्ह्यातील कामांची आकडेवारी
प्रकल्प निर्मिती: ५८
जिओ रेफरन्सिंग झालेले प्रकल्प: ७५
अंदाजपत्रक तयार केलेले प्रकल्प: ३०२
तांत्रिक मान्यता: २६९
प्रशासकीय मंजुरी: २१२
क्लस्टर निर्मिती: २०
यामध्ये ८६ प्रकल्प असून याची एकूण लांबी १३८.८५ कि. मी. इतकी आहे.
- वर्क ऑर्डर दिलेले प्रकल्प: १३ कार्यादेशांद्वारे ६० प्रकल्पांची कामे सुरू
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाणंद रस्त्याच्या प्रकल्पांची आकडेवारी जाहीर (Panand Raste Yojana)
पाणंद रस्त्याच्या प्रकल्प निर्मितीत कर्जत-जामखेड ८८, अकोले ८७ आणि नेवासा ८५ या तालुक्यात सर्वाधिक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर, संगमनेर ५६, शेवगाव ५०, राहुरी ३७, पारनेर ३८, श्रीगोंदा ४०, शिर्डी ३४ तर सर्वात कमी नगर शहर १६ प्रकल्पांची निर्मिती झाली आहे. शिर्डीमध्ये ३४ प्रकल्पांची निर्मिती झाली असली तरी अद्याप एकाही प्रकल्पाचे अंदाजपत्रक किंवा पुढील कार्यवाही झालेली नाही
श्रीरामपूर तालुक्यात तीन क्लस्टर ३५.५५ कि.मी. आणि नेवासा येथे १६ प्रकल्पांचे चार क्लस्टर २२.८० कि.मी. पर्यंत तयार करण्यात आले आहेत. यामध्ये कर्जत-जामखेडमध्ये सर्वाधिक ४९ प्रकल्पांना, तर त्या खालोखाल पारनेरमध्ये ३६ आणि राहुरीमध्ये २५ प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी सुलभ रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने प्रशासन स्तरावर या योजनेचा नियमित आढावा घेतला जात असून, जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंतची पाणंद रस्त्याच्या प्रकल्पांची आकडेवारी जाहीर केली आहे.


