
Pre-Recruitment Training : नगर : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Integrated Tribal Development Project) राजूर, (ता.अकोले , जि. अहिल्यानगर) या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र (Military Recruitment Pre-training Centre) मवेशी, (ता. अकोले जि. अहिल्यानगर) येथे फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुलांसाठी ०१ डिसेंबर २०२६ ते दिनांक ३१ मार्च २०२७ या चार महिने कालावधीचे पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे (Pre-recruitment Training) निवासी व भोजन व्यवस्थेसह मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
नक्की वाचा : महापालिकेच्या न्यायालयीन विभागाचे काम म्हणजे ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’; सभापती लोंढेंचा संताप
मुलांसाठी प्रशिक्षणास आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे
१) आवश्यक कागदपत्रे: इ.१२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड, डोमीसाईल दाखला. ४ (चार) पासपोर्ट साईज फोटो
२) शारीरिक पात्रता: वजन किमान ५० कि.ग्रॅ. असावे तसेच वय १८ ते २६ वर्षे व उंची कमीत कमी १६५ से.मी. असावी
३) निवड पध्दत : शारीरिक क्षमता चाचणी १६०० मिटर रनींग (मार्क-५०), लेखी परीक्षा (मार्क-५०) एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मेरीटनुसार करण्यात येईल
४) २६ नोव्हेबर २०२६ पर्यंतच उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारले जातील. त्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
(अर्ज भरावयाचे व जमा करावयाचे ठिकाण :- पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता.अकोले, जि. अहिल्यानगर)
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कागदपत्रांसह उपस्थित राहाण्याचे आवाहन (Pre-Recruitment Training)
अर्ज भरलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनी २७ नोव्हेबर २०२६ रोजी या परीक्षेसाठी पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथे सकाळी ठिक १०.०० वाजता मूळ व झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर, (ता. अकोले, जि.अहिल्यानगर) देवकन्या बोकडे, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६ /८२७५३४९४१४ /९९६०११२६०० या क्रमांवर संपर्क साधावा.


