Sujay Vikhe Patil : अजित पवारांच्या वारसाचा अधिकार केवळ सुनेत्रा पवारांनना! मुख्यमंत्र्यांवरील आरोप खपवून घेणार नाही; सुजय विखेंचा रोहित पवारांना थेट टोला

Sujay Vikhe Patil : अजित पवारांच्या वारसाचा अधिकार केवळ सुनेत्रा पवारांनना! मुख्यमंत्र्यांवरील आरोप खपवून घेणार नाही; सुजय विखेंचा रोहित पवारांना थेट टोला

0
Sujay Vikhe Patil : अजित पवारांच्या वारसाचा अधिकार केवळ सुनेत्रा पवारांनना! मुख्यमंत्र्यांवरील आरोप खपवून घेणार नाही; सुजय विखेंचा रोहित पवारांना थेट टोला
Sujay Vikhe Patil : अजित पवारांच्या वारसाचा अधिकार केवळ सुनेत्रा पवारांनना! मुख्यमंत्र्यांवरील आरोप खपवून घेणार नाही; सुजय विखेंचा रोहित पवारांना थेट टोला

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुजय विखे आक्रमक; ऊसदर, शेतकरी प्रश्न आणि अजित पवार अपघात प्रकरणावर स्पष्ट भूमिका

Sujay Vikhe Patil : नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) अध्यक्षपदाचा पदभार माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आज स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सहकारविषयक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. विशेषतः अजित पवार यांच्या अपघातावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरून त्यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना लक्ष्य केले. स्वर्गीय अजित पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून केवळ सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचाच अधिकार असल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांवर केले जाणारे आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुजय विखे म्हणाले

अजित पवार यांच्या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्याचा अधिकार सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांनाच आहे. इतरांनी या विषयात अनावश्यक प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. या प्रकरणात उत्तर देण्याचा अधिकारही आम्हाला नाही, असे विखे म्हणाले. घातपात झाला असता तर विमान विमानतळावर आलेच नसते, असे विधान करत त्यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप मला अजिबात पटले नाहीत (Sujay Vikhe Patil)

सहा महिने झाले, मग न्यायालयात जाऊन दाद का मागितली नाही? न्याय मागण्याची एक प्रक्रिया आहे, ती अवलंबली पाहिजे. मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप मला अजिबात पटले नाहीत. आमच्या नेत्यांना या प्रकरणात ओढले जात असल्यानेच आम्ही भूमिका मांडली, असेही त्यांनी सुनावले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना विखे यांनी बँकेच्या कारभाराबाबतही भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली असून, बँकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील. कारखानदार आणि शेतकरी या दोघांनाही समान न्याय देण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

ऊसदराच्या प्रश्नावर बोलताना २४ तारखेला राजू शेट्टी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. साखरेचे दर स्थिर राहिल्यास शेतकऱ्यांना निश्चितच न्याय देता येईल. मात्र, बँकेची आर्थिक परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन घाईघाईने निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावरही भर राहणार आहे.
दरम्यान,अहमदनगर जिल्हा बँकेचे नामकरण अहिल्यानगर करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. यासाठी रिझर्व्ह बँकेचे निकष आहेत. त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. शेतकरी आणि बँकेच्या हिताचा जो निकष असेल, तोच माझ्यासाठी महत्त्वाचा असेल, असे विखे म्हणाले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे, थोरात आणि गडाख एकत्र आल्याने भविष्यातही राजकीय एकी राहणार का, या प्रश्नावर त्यांनी सहकाराच्या निवडणुकीसाठी सर्वजण एकत्र आल्याचे सांगितले. बँकेच्या सभागृहात पक्षीय झेंडे बाजूला ठेवून काम करू; मात्र बँकेबाहेर प्रत्येकजण आपापल्या पक्षाचे काम करेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. पदभार स्वीकारताच राजकीय फटकेबाजी, शेतकरी प्रश्नांवर सावध भूमिका आणि अजित पवार प्रकरणावरून रोहित पवारांना थेट लक्ष्य केल्याने सुजय विखे यांच्या पहिल्याच दिवसाच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.