नगर : राज्यात यंदा पाऊस न पडल्याने दुष्काळाचे (Maharashtra Drought) मोठं संकट ओढवलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३०८ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. याच दुष्काळामुळे केंद्र व राज्य शासनाकडून बहुतांश विकास कामांच्या निधीला कात्री लागली आहे. मात्र, ऐन दुष्काळात सुद्धा नाशिक येथील कुंभमेळ्यातील (Nashik Kumbhamela) कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच बिले मिळतात. त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील लहान-मोठ्या ठेकेदारांनी (Contractor) सुद्धा नाशिकच्या कुंभमेळ्यातील कामे (Tasks at the Kumbh Mela) मिळविण्यासाठी मोर्चा वळविला आहे. विशेष म्हणजे महायुतीतील नेत्यांकडे ही कामे मिळविण्यासाठी लॉबिंग सुरू (Lobbying to secure work) आहे.
नक्की वाचा : इन्स्टाग्रामवर आता अश्लील अन् हिंसक कंटेंटला चाप! मेटाकडून नियमांत मोठे बदल
कुंभमेळ्यामुळे विकास कामांच्या निधीत कपात (Ahilyanagar News)

नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी सगळीकडे विकास कामांचा धडाका सुरू असतो. परंतु, यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्याचा परिणाम विकास कामांना मिळणाऱ्या निधीवर झाला आहे. विविध विकास कामांच्या निधीत यामुळे कपात करण्यात आली आहे. सरकार ही कामे ठेकेदारांमार्फत करत असते. दुष्काळामुळे नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत.
अवश्य वाचा : क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने मोठी झेप; मृत्यूदरात ३८ टक्क्यांची घसरण!
नाशिक शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ३० हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यावधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांना सुविधा पुरविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या विकास कामांसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. त्यामुळेच अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांनी नाशिक येथील कामांच्या निविदा दाखल केल्या आहेत. काहींनी कामे मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांकडे लॉबिंग केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपले राजकीय वजन वापरून ठेकेदारांमार्फत लहान-मोठी कामे मिळविली आहेतत.
महायुतीच्या कार्यकर्त्यांची नाशिक वारी (Ahilyanagar News)
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि सत्तेचा लाभ विकासकामांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे नाशिक येथील कुंभमेळाही कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारे पर्वणीच ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, महापालिका, जलसंधारण, पाटबंधारे यासह इतर विभागातील विकास कामांची कोट्यवधींची बिले थकीत आहेत.थकीत बिले मिळावीत, यासाठी ठेकेदार संघटनेच्या वतीने मध्यंतरी आंदोलन करण्यात आले होते. तरीही बिले न मिळाल्याने ठेकेदारांनी रोख पैसे देणाऱ्या नाशिक शहरातील कामांना पसंती दिली आहे.
महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठेकेदारांच्या नावावर कामे घेतली आहेत. कामे पूर्ण करून राजकीय वजन वापरून बिलेही काढून घेतली आहेत.विकासकामांचे रोख पैसे मिळत असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा दुष्काळाच्या परिस्थितीतही चांगलाच सुकाळ सूर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच याच महायुतीच्या कार्यकर्त्यांची शिफारस पत्रासाठी धावपळ सुरू आहे. आपल्या राजकीय पक्षाचे मंत्री, आमदारांचे शिफारसपत्राच्या आधारे नाशिकमध्ये कामे घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र नगरच्या ठेकेदारांनी नाशिकमधील कामे घेतल्याने स्थानिक विकास कामांची गती मात्र मंदावली आहे. अहिल्यानगर महापालिकेसह विविध शासकीय विभागाच्या निविदांना ठेकेदारांकडून थंडा प्रतिसाद यामुळे मिळताना दिसत आहे.



