Rohit Pawar | नगर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना न्याय मिळावा, यासाठी आपण आपली भूमिका ठामपणे मांडत असल्याचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अहिल्यानगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. एखाद्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुलांसाठी मोफत पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण
अमित शाह यांना पत्र ( Rohit Pawar )
रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र धर्म आणि संविधान टिकविण्यासाठी आपला लढा सुरू आहे. अजितदादांना न्याय मिळावा, ही आपली भूमिका असून राज्यातील जनता या भूमिकेसोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विलिनीकरण होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टीका, पुतळे जाळणे किंवा अन्य विरोध झाला तरी आपला संघर्ष थांबणार नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिले असून, व्ही. के. सिंग यांना देशाबाहेर जाऊ देऊ नये, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डिंभे-माणिकडोह प्रकल्पावर अधिवेशनात आवाज उठवणार ( Rohit Pawar )
डिंभे-माणिकडोह प्रकल्पाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याबाबत विचारले असता, सरकारकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असून, त्यानंतर आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करू, असे पवार यांनी सांगितले. एक डिसेंबर रोजी कृती समितीच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनाबाबत विचारले असता, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर त्यांच्यासोबत राहण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यांवर अन्याय होऊ नये, ही तेथील शेतकऱ्यांची भावना आहे. मात्र, या प्रश्नात राजकारण केले जात असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदारसंघ फोडण्याचा डाव खपवून घेणार नाही ( Rohit Pawar )
महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी भूमिका मांडली. लोकसभा मतदारसंघांची ५० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत काहींनी अनुकूल भूमिका घेतली असली, तरी मतदारसंघांची पुनर्रचना कोणत्या पद्धतीने केली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. आसाममध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघांची पुनर्रचना झाली, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदारसंघांची पुनर्रचना संविधानाच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने होत असेल तर आमचा विरोध नाही. मात्र, संपूर्ण प्रक्रिया भाजपच्या नियंत्रणाखाली असेल तर ते मान्य होणार नाही. मतदारसंघ पुनर्रचना समितीमध्ये विरोधी पक्षनेत्याला स्थान मिळाले पाहिजे. निवडणूक आयोगाचा प्रमुख सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. नगरपालिकांमध्ये जसे प्रभाग फोडले जातात, त्याच पद्धतीने लोकसभेचे मतदारसंघ फोडण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपकडून मीडिया ट्रायलचा प्रयत्न ( Rohit Pawar )
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावर बोलताना संबंधितांनी माफी मागितल्याचे पवार म्हणाले. भाजपने संबंधितांना हाताशी धरून मीडिया ट्रायल सुरू केली असून, आमच्या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी मिळू नये, यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा स्पष्ट इशारा रोहित पवार यांनी दिला.



