Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडून पाहणी, लवकरच उद्घाटन

0
Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे
Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे

Ahilyadevi Holkar Statue : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या चर्चगेट स्टेशन (Churchgate Station) जवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण पूर्ण होत आले असून आज (ता. 19) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी या ठिकाणी भेट दिली आणि सौंदर्य – कलात्मकता वाढीच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना दिल्या. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले, कार्यकारी अभियंता विराज जाधव आणि सहायक अभियंता, परिरक्षण ए विभाग रवी म्हस्के, दुय्यम अभियंता गणेश ठाकूर हे उपस्थित होते.

नक्की वाचा : महाराष्ट्राला भीकमुक्त, भूकमुक्त आणि कुपोषणमुक्त करण्यासाठी राज्य अन्न आयोगाचा पुढाकार

Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे
Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे

राजवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती

पुतळा परिसराचे दुरुस्तीकार्य, सुशोभिकरण तातडीने पूर्ण व्हावे तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती, इंदोर येथील वास्तूशिल्प, भित्तीशिल्पाद्वारे ऐतिहासिक संदर्भ आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात यावे, अशी संकल्पना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महापालिका अधिकारी यांच्या बैठकीत स्पष्ट केली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे
Ahilyadevi Holkar Statue : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे

लवकरच सुशोभित स्थळाचे उद्घाटन (Ahilyadevi Holkar Statue)

त्यानुसार सुरु झालेले हे काम आता पूर्णत्वास आले आहे. सौंदर्य आणि कलात्मकतेच्या दृष्टीने आजच्या पाहणीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांनी महत्वपूर्ण सूचना यावेळी केल्या. याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लवकरच या सुशोभित स्थळाचे उद्घाटन करण्यात येईल.