नगर : “एक ४५ वर्षांची महिला, रोजच्यासारखीच गुरं घेऊन रानात गेली, पण तिचा हा प्रवास शेवटचा ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. ही घटना संगमनेर (Sangamner Crime) तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील खंडेरायवाडी येथील एका विवाहित महिलेचे अपहरण (Abduction of a woman) करून तिला दगडाने ठेचून संपवण्यात (Killed by crushing with a stone) आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तिचा मृतदेह साकूर दरा येथील खोल दरीत फेकून देण्यात आला.
नक्की वाचा : अहिल्यानगरचे ठेकेदार वळले कुंभमेळ्याकडे; महायुतीतील नेत्यांकडे कामासाठी लॉबिंग
नेमकं काय घडलं? (Sangamner Crime)

मनीषा रामनाथ चाचण (वय ४५, रा. चाचणवस्ती, खंडेरायवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी (ता. १८) ही महिला गायी चारण्यासाठी रानात गेली होती. सायंकाळी न आल्याने पती रामनाथ चाचण यांनी तिचा शोध घेतला. अखेर तिचे अपहरण झाले असल्याची फिर्याद त्यांनी घारगाव पोलिसांत दिली. गुरुवारी (ता.१९) सकाळी काही तरुण साकूर दरा परिसरात गेले असता त्यांना तेथे रक्ताचे डाग दिसून आले.
अवश्य वाचा : अलर्ट! SBI ची UPI सेवा उद्या ४५ मिनिटे ठप्प राहणार; ‘हे’ आहे कारण
महिलेचा मृतदेह दरीत असल्याचे समजताच घारगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आदिनाथ गांधले, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, रामभाऊ भुतांबरे, चांगदेव नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. फॉरेन्सिक टीम, तसेच श्वान पथकाला यावेळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर खोल दरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मृतदेह दरीत सापडला (Sangamner Crime)
महिलेला संपवून तिचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. तसेच दगडाने मारून तिला संपवण्यात आल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांनी सांगितले. घटनास्थळाच्या परिसरात खोल दरीच्या वरच्या बाजूला एक मोबाईल, रक्ताने माखलेले दगड, बांगड्या आढळून आल्या, तसेच दरीतही रक्ताने माखलेले दगड, झाडात अडकलेला स्कार्फ, पिशवी, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली, असे साहित्य आढळले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केलं असून या प्रकरणाचा शोध ते घेताना दिसत आहेत.



