Cannabis being sold from a house in Kukana : कुकाण्यात घरातून गांजाची विक्री; दोघे पोलिसांच्या ताब्यात

Cannabis being sold from a house in Kukana

0
Cannabis being sold from a house in Kukana : कुकाण्यात घरातून गांजाची विक्री; दोघे पोलिसांच्या ताब्यात
Cannabis being sold from a house in Kukana : कुकाण्यात घरातून गांजाची विक्री; दोघे पोलिसांच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Cannabis being sold from a house in Kukana : नगर : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घरातून गांजाची विक्री (Cannabis being sold from a house in Kukana) सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत शाहमद मेहबुब शेख (वय ४८, रा. मुलाणीवाडा, जुम्मा मशीदजवळ, कुकाणा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून ११ किलो १८२ ग्रॅम गांजासह वजनकाटा, वजनमापे व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात गांजा पुरवठा केल्याच्या आरोपावरून मल्हारी मोहन बोरुडे (रा. मजलेशहर, ता. शेवगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घरात गांजाचा साठा असून विक्रीची माहिती

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार केले होते. हे पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना कुकाणा येथील शाहमद शेख याच्या घरात गांजाचा साठा असून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

११.१८२ किलो गांजा आढळला (Cannabis being sold from a house in Kukana)

पोलिसांनी ही माहिती नेवासा पोलीस ठाण्याला लेखी स्वरूपात कळवली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांच्या आदेशाने नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत शेख याच्या घराची झडती घेतली. यावेळी तीन गोण्यांमध्ये भरलेला ११.१८२ किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा, वजनकाटा, वजनमापे, स्टीलचे भांडे आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान शेख याने हा गांजा मल्हारी बोरुडे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन बोरुडे यालाही ताब्यात घेतले. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे कुकाणा परिसरातील अवैध गांजा विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे.