
Kotwali Police Station : नगर : घरकामासाठी येणाऱ्या महिलेने वृध्द महिलेच्या घरातील (Theft at an elderly woman’s house) कपाटातून सोन्याचे २७ ग्रॅमचे घड्याळ, साडेचार हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ७४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील आनंदधाम परिसरात घडली. याप्रकरणी लता रतनलाल बोरा (वय ७८, रा. अर्चना अपार्टमेंट, आनंदधामसमोर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे.
नजर चुकवून चाेरी केल्याचा आराेप
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, बोरा यांच्या घरी अंजली (पूर्ण नाव माहिती नाही) नावाची महिला घरकामासाठी येत होती. सोमवारी (ता.१६ ) सकाळी ९ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान ती घरकामासाठी आली असताना तिने बोरा यांची नजर चुकवून बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचा बेल्ट असलेले सुमारे २७ ग्रॅम वजनाचे मनगटी घड्याळ चोरले. तसेच ४ हजार ५०० रूपये रोख आणि बेडवर ठेवलेला मोबाईलही लंपास केला. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत ७४ हजार ५०० रुपये आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कोतवाली पोलीस ठाण्यात दिली फिर्याद (Kotwali Police Station)
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर बोरा यांनी संबंधित महिलेकडे वारंवार ऐवजाची मागणी केली. मात्र, तिने ऐवज परत न केल्याने अखेर बुधवारी (ता.१८) त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अंजली नामक महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार स्वाती तोरडमल तपास करीत आहेत.


