Water Leakage | नगर : अहिल्यानगर शहरात पिण्याचे पाणी रस्त्यावर टाकणाऱ्या नागरिकांना महापालिका दंड करत आहे. मात्र, दुसरीकडे तब्बल सात वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधून होणारी गळती ( Water Leakage ) अद्याप दुरुस्त न झाल्याने बाबा बंगाली इब्राहिम कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
सात वर्षांपासून लिकेज ( Water Leakage )
बाबा बंगाली इब्राहिम कॉलनी परिसरातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन गेल्या सात वर्षांपासून लिकेज असल्याची समस्या कायम आहे. या पाइपलाइनमधून सातत्याने पाणी गळत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांमधून नाराजी व्यक्त ( Water Leakage )
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे इतक्या मोठ्या कालावधीपासून पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सदर पाणीगळतीची समस्या अनेक वर्षांपासून कायम असूनही अद्याप त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पिण्याचे पाणी ही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असून त्याचा अशा प्रकारे अपव्यय होणे ही चिंतेची बाब आहे.
संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाइपलाइनची पाहणी करावी आणि लिकेजची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर प्रशासन आता तरी ठोस कार्यवाही करणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



