Free Plastic Surgery Camp : अहिल्यानगरमध्ये ९ ते ११ डिसेंबरदरम्यान २५ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर; अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करणार १५० रुग्णांवर शस्त्रक्रिया

Free Plastic Surgery Camp : अहिल्यानगरमध्ये ९ ते ११ डिसेंबरदरम्यान २५ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर; अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करणार १५० रुग्णांवर शस्त्रक्रिया

0
Free Plastic Surgery Camp : अहिल्यानगरमध्ये ९ ते ११ डिसेंबरदरम्यान २५ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर; अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करणार १५० रुग्णांवर शस्त्रक्रिया
Free Plastic Surgery Camp : अहिल्यानगरमध्ये ९ ते ११ डिसेंबरदरम्यान २५ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर; अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करणार १५० रुग्णांवर शस्त्रक्रिया

Free Plastic Surgery Camp : अहिल्यानगर: सामान्य व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरलेले २५ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर (Free Plastic Surgery Camp) येत्या ९, १० आणि ११ डिसेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना (अहिल्यानगर), चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने, स्व. पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित (Dr. Sharadkumar Dixit) (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

१५० गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

सिव्हिल हॉस्पिटलमधील आयुष रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात अमेरिकेतील प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. राज लाला आणि त्यांची टीम सुमारे १५० गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार आहे. या उपक्रमाची माहिती चांदमल मुनोत ट्रस्टचे ट्रस्टी श्री. किशोर मुनोत आणि भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. आदेश चंगेडिया यांनी दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोणत्या शस्त्रक्रिया मोफत होणार? (Free Plastic Surgery Camp)

प्लॅस्टिक सर्जरीचा खर्च सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांतील अनेक रुग्ण या शिबिराचा लाभ घेतात. या शिबिरात खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील:

  • दुभंगलेले ओठ (Cleft Lip)
  • चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण किंवा डाग
  • नाक आणि कानावरील बाह्य व्यंग
  • पापण्यांतील विकृती

(महत्त्वाची सूचना: या शिबिरात जळालेले, भाजलेले किंवा अंगावर पांढरे डाग (कोड) असलेल्या रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया होणार नाहीत, याची नोंद घ्यावी.)

नोंदणी आणि तपासणीचे वेळापत्रक

  • तारीख व वार: फक्त बुधवार, दिनांक ९ डिसेंबर २०२६
  • वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंतच
  • ठिकाण: आयुष रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसर, अहिल्यानगर
    (नोंदणी व प्राथमिक तपासणीनंतर उर्वरित वेळेत व पुढील दोन दिवसांत निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडतील.)

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आणि नियोजन
गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. स्व. डॉ. शरदकुमार दिक्षित यांचे शिष्य डॉ. राज लाला व सौ. ललिता लाला दरवर्षी अमेरिकेतून अहिल्यानगरला येऊन या शिबिरात मोफत सेवा देतात. यंदा त्यांच्यासोबत सुरत येथील डॉ. उज्ज्वल भावसार तसेच स्थानिक तज्ज्ञ डॉ. नूतन फिरोदिया, डॉ. दीपा भळगट आणि डॉ. मृदुला मुळे यांचेही मोलाचे योगदान लाभणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबिर प्रमुख म्हणून श्री. प्रशांत गांधी, श्री. शशिकांत मुनोत आणि श्री. अरुण दुगड विशेष परिश्रम घेत आहेत. दरम्यान, डिसेंबर महिन्यातच डॉ. राज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी (ओपीडी), पालघर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अशाच प्रकारची मोफत शिबिरे पार पडणार आहेत.

अधिक माहिती व संपर्कासाठी:
गरजू रुग्णांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:

  • श्री. आदेश चंगेडिया: ९०१११५५५९९
  • श्री. प्रशांत गांधी: ८००७०७४०००
  • श्री. शशिकांत मुनोत: ९४२०४७७०५२
  • श्री. अरुण दुगड: ९८२२०२७३७३