Constitution Day | संविधान दिनानिमित्त गुरुवारी संविधान जागर महोत्सवाचे आयोजन; डॉ. राजेंद्र धामणे यांची स्वागताध्यक्षपदी निवड

0

Constitution Day | नगर : मानवाधिकार अभियान व सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, सहायक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून अहिल्यानगरमध्ये गुरुवारी (ता. २६) संविधान दिनानिमित्ताने संविधान जागर महोत्सवाचे ( Constitution Day ) आयोजन करण्यात आले आहे. यादृष्टीकोनातून संविधान जागर महोत्सव समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. 

अवश्य वाचा – यंदा पहिल्यांदाच रंगणार ‘अहिल्यानगर महाकरंडक बाल नाट्य स्पर्धा २०२७’; राज्यभरातील बालकलाकारांना हक्काचे भव्य व्यासपीठ!

सर्वानुमते निवड ( Constitution Day )

सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे यांची संविधान जागर महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, अशोक सब्बन, डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदीप जारे, सॅम्यूएल वाघमारे, भैरवनाथ वाकळे आदी समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

डॉ. धामणे यांचे सामाजिक कार्य ( Constitution Day )

डॉ. राजेंद्र धामणे हे गेल्या तीन दशकांपासून लोकशाही व संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. निराधार, बेघर आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या, घर आणि मन हरवललेल्या महिला व मुलांना कायमस्वरूपी निवारा, उपचार आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनगाव या स्वयंपूर्ण गावाची निर्मिती केली आहे. सामाजिक कार्यासोबतच ते लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक म्हणूनही परिचित आहेत. त्यांची कादंबरी व दीर्घकथा संग्रह प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक लघुपट व माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या काही कलाकृतींची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झाली आहे. विविध वर्तमानपत्रांतून सामाजिक विषयांवर त्यांनी स्तंभलेखन केले असून, त्यांनी लिहिलेली चार नाटके राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाली आहेत. त्यापैकी एका नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतून संविधानातील मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत रुजविण्याचे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वागताध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दरवर्षी संविधान दिन साजरा ( Constitution Day )

संविधान जागर महोत्सवाविषयी अधिक माहिती देतांना मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी सांगितले की, मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. संविधान जागर महोत्सवाचे यंदाचे ९ वे वर्ष आहे. याही वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्याचा मानवाधिकार अभियान तसेच अहिल्यानगर सोशल फोरमच्या सर्व पुरोगामी संस्था संघटना यांचा मानस आहे.संविधान जागर महोत्सवाअंतर्गत यावर्षी संविधान रॅलीच्या सोबतच २६ नोव्हेंबर संविधान दिन ते १० डिसेंबर मानवाधिकार दिन या दरम्यान संविधान जागर पंधरवडा साजरा करण्यात येणार असून संविधानाचा अधिकाधिक प्रचार व्हावा म्हणून संविधान जागर रथ, पथनाट्य, संविधान गीते, प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे, शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी या स्वरुपात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभागाचे प्रवीण कोरगंटीवार  यांनी दिली. 

बैठकीत झालेले निर्णय ( Constitution Day )

समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार याविषयी अधिक माहिती देतांना डॉ. सुरेश पठारे म्हणाले कि गुरवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९.३० ते १२.३० दरम्यान संविधान जागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत शहरातून भव्य संविधान जागर रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीचा मार्ग महापुरुषांना अभिवादन करत  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, महात्मा फुले यांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सीएसआरडी महाविद्यालय असा असणार असून सीएसआरडी महाविद्यालय येथे संविधान जागर सभेने रॅलीचा समारोप होणार आहे. संविधान जागर सभेत संविधान अभ्यासक प्रा.सुभाष वारे यांचे व्याख्यान होणार आहे. या संविधान जागर रॅलीस जास्तीत जास्त संस्था, संघटना, महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा व भारतीय संविधान संवर्धनासाठी आपले बहुमोल योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी डॉ. सुरेश पठारे यांनी केले आहे. संविधान जागर महोत्सवाअंतर्गत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ॲड. संतोष गायकवाड,  संध्या मेढे, सॅम्यूएल वाघमारे, भैरवनाथ वाकळे यांच्याशी  संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here