
Ahilyanagar Mahakarandak Children’s Drama Competition 2027 : अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा (One-Act Play Competition) म्हणून नाट्यवर्तुळात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ‘अहिल्यानगर महाकरंडक’ने यंदाच्या १४ व्या वर्षात एक ऐतिहासिक आणि अभिनव पाऊल टाकले आहे. ‘अहिल्यानगर महाकरंडक’चा हा १४ वर्षांचा गौरवशाली नाट्यवारसा नव्या पिढीकडे सोपवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘अहिल्यानगर महाकरंडक बाल नाट्य स्पर्धा २०२७’ (Ahilyanagar Mahakarandak Children’s Drama Competition 2027) चे आयोजन करण्यात आले आहे.
अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंटस् आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान, अहिल्यानगर आयोजित आणि आय लव्ह नगर (I Love Nagar) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी लेट्सअप (Letsupp) हे डिजिटल पार्टनर म्हणून काम पाहत आहेत.
स्पर्धेमागील मुख्य विचार आणि उद्देश:
गेल्या १३ वर्षांपासून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ने राज्यातील हजारो नवोदित रंगकर्मींना व्यासपीठ देऊन मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका विश्वासाठी अनेक सक्षम कलाकार घडवले आहेत. रंगभूमीची हीच चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी आणि शालेय वयातच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यावसायिक रंगमंचाचा थेट अनुभव घेता यावा, या उदात्त हेतूने यंदापासून बालनाट्य स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

अध्यक्ष मनोगत (नरेंद्र फिरोदिया):
“गेल्या १३ वर्षांत ‘अहिल्यानगर महाकरंडक’ने मराठी रंगभूमीला अनेक गुणी कलाकार दिले आहेत. नाट्यकलेचे हेच संस्कार शालेय वयातच नव्या पिढीवर रुजावेत आणि बालकलाकारांनाही एका मोठ्या, व्यावसायिक रंगमंचाचा अनुभव मिळावा, या विचारातून यंदा आम्ही पहिल्यांदाच ‘बाल नाट्य स्पर्धा’ सुरू करत आहोत. हे आमचे पहिलेच वर्ष असल्याने राज्यातील सर्व शाळा, नाट्यसंस्था, पालक आणि बालकलाकारांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.”
-नरेंद्र फिरोदिया (अध्यक्ष, अहिल्यानगर महाकरंडक समिती)
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्पर्धेचे वेळापत्रक आणि महत्त्वाची माहिती: (Ahilyanagar Mahakarandak Children’s Drama Competition 2027)
- नोंदणी सुरू: १४ नोव्हेंबर २०२६ पासून
- नोंदणीची अंतिम मुदत: १० डिसेंबर २०२६
- प्राथमिक फेरी (तालीम स्वरूपात): २३ डिसेंबर २०२६ ते ५ जानेवारी २०२७
- अंतिम फेरी: १२ जानेवारी २०२७
- पारितोषिक वितरण सोहळा: १६ जानेवारी २०२७ (‘अहिल्यानगर महाकरंडक २०२७’ च्या मुख्य भव्य सोहळ्यात)
•अंतिम फेरीचे ठिकाण: माऊली सभागृह, माऊली संकुल, झोपडी कॅन्टीन शेजारी, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर
पात्रता आणि नियम:
- सहभाग: महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालये तसेच हौशी नाट्यसंस्थांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
- वयोमर्यादा: केवळ १४ वर्षांखालील बालकलाकारांसाठी.
- संघ रचना: मंचावर किमान २ आणि कमाल २० बालकलाकार सहभागी होऊ शकतात (कलाकार व तंत्रज्ञ मिळून संपूर्ण संघाची सदस्यसंख्या २५ पेक्षा जास्त नसावी).
- सादरीकरण वेळ: अंतिम फेरीत नेपथ्य उभारणी, प्रकाश व ध्वनी योजनेसह सादरीकरण आणि रंगमंच रिकामा करण्यासाठी एकूण ६० मिनिटांचा (१ तास) कालावधी असेल.
आकर्षक सांघिक पारितोषिके:
- प्रथम क्रमांक: ₹ ५१,१११/- रोख + अहिल्यानगर बालनाट्य करंडक
- द्वितीय क्रमांक: ₹ ३१,१११/- रोख + करंडक
- तृतीय क्रमांक: ₹ २१,१११/- रोख + करंडक
- चतुर्थ क्रमांक: ₹ ११,१११/- रोख + सन्मानचिन्ह
- उत्तेजनार्थ: ₹ ५,१११/- रोख + सन्मानचिन्ह
नोंदणी कशी कराल?
स्पर्धेचे प्रवेश शुल्क ₹ १,१००/- प्रति संघ असून इच्छुक शाळा व नाट्यसंस्थांनी आपली नोंदणी फक्त www.mahakarandak.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावी. अधिक माहितीसाठी ७२७६ ३५५ १४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी सोशल मीडियावर फॉलो करा:
- वेबसाईट: www.mahakarandak.com
- इंस्टाग्राम: @balnatyaspardha
- फेसबुक: BalNatyaSpardha


