
National Volleyball Championship : शिर्डी : खेळातून साईबाबांच्या ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश येथे आलेले खेळाडू देतील. या स्पर्धांमधून साईबाबांचा हा संदेश खेळाडू देशभर पोहोचवतील, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे), स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय), जिल्हा क्रीडा परिषद (अहिल्यानगर) व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे (National Volleyball Championship) शानदार उद्घाटन झाले.
अनेक मान्यवर उपस्थित
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकचे आमदार राहुल ढिकले, साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, अपर जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपनगराध्यक्ष अभय शेळके, एसजीएफआयचे निरीक्षक हिमांशू शुक्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव नीलेश जगताप, उपाध्यक्ष शैलेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निरीक्षक हिमांशू शुक्ला म्हणाले की, (National Volleyball Championship)
“एसजीएफआय देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करत असून जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचे वर्चस्व स्थापित करण्याचा आमचा मानस आहे. पहिल्याच प्रयत्नात शालेय जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत एसजीएफआयच्या १५ वर्षांखालील भारतीय संघाने कांस्यपदक (ब्राँझ) पटकावले आहे, तर यावर्षी १८ वर्षांखालील मुलांच्या संघाने जागतिक स्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनालाही प्रारंभ झाला असून यामध्ये एसजीएफआयचे अध्यक्ष दीपक कुमार पुढाकार घेत आहेत.”

याप्रसंगी साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लहान मुलांनी सादर केलेल्या साईबाबांच्या पालखी सोहळ्यात मंत्री विखे पाटीलही दंग झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले, तर प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांनी आभार मानले.


