Raid On A Gambling Den | नगर : तालुक्यातील बेलापूर येथील बसस्थानकाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ( Raid On A Gambling Den ) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुद्देमाल हस्तगत ( Raid On A Gambling Den )
चांगदेव परसराम देखणे (४२, रा. उंबरगाव), सूरज विलास कुमावत (३२), विनायक ज्ञानेश्वर मोरे (२२), सतीश अनिल गायकवाड (२७), विकास विठ्ठल गायकवाड (२५), गणेश सोपान टाक (४०), संकेत श्रीराम कुमावत (२८), सचिन श्याम खाजेकर (३५), सुनील विजय खरात (२३) आणि संतोष बबन गाडे (३६) अशा दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पथकाची कारवाई ( Raid On A Gambling Den )
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकाला अवैध व्यवसायांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना बेलापूर बसस्थानकाच्या पाठीमागील एका पत्र्याच्या टपरीत काही जण सोरटच्या पानावरील चित्रांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर पथकाने पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
गुन्हा दाखल ( Raid On A Gambling Den )
या कारवाईत चांगदेव परसराम देखणे (वय ४२, रा. उंबरगाव), सूरज विलास कुमावत (वय ३२), विनायक ज्ञानेश्वर मोरे (वय २२), सतीश अनिल गायकवाड (वय २७), विकास विठ्ठल गायकवाड (वय २५), गणेश सोपान टाक (वय ४०), संकेत श्रीराम कुमावत (वय २८), सचिन श्याम खाजेकर (वय ३५), सुनील विजय खरात (वय २३) व संतोष बबन गाडे (वय ३६) अशा १० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.



