Legal Guidance for Inmates : जिल्हा कारागृहातील कैद्यांना कायदेविषक मार्गदर्शन

Legal Guidance for Inmates

0
Legal Guidance for Inmates : जिल्हा कारागृह कैद्यांना कायदेविषक मार्गदर्शन
Legal Guidance for Inmates : जिल्हा कारागृह कैद्यांना कायदेविषक मार्गदर्शन
Legal Guidance for Inmates : अहिल्यानगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण(District Legal Services Authority), अहमदनगर जिल्हा कारागृह, वर्ग-२, यांच्या संयुक्त विदयमाने शुक्रवार, दिनांक २०/११/२०२६ रोजी जिल्हा कारागृह, वर्ग – २ या ठिकाणी राष्ट्रीय विधी सेवा सप्ताह अंतर्गत बंद्याना कायदेविषयक जागरूकता (Legal Guidance for Inmates) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विवाद निराकरणबाबत दिली माहिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महेश द. जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर हे होते. यावेळी बोलतांना त्यांनी, बंदी बांधवांना विवाद निराकरण म्हणजे न्यायालयाबाहेर वाद सोडवण्याची जलद, कमी खर्चाची आणि लवचिक पद्धत होय. यामध्ये प्रामुख्याने वाटाघाटी, मध्यस्थी, सलोखा, लवाद आणि लोकअदालत या पद्धतींचा समावेश होतो अशी माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज या विषयी माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक १५१०० या विषयी सांगितले. ॲड. आरती सरोदे, यांनी मूलभूत कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कायदेशीर हक्काबाबत मार्गदर्शन (Legal Guidance for Inmates)

ॲड. श्रीमती पूनम जानराव-मुनोत, सहायक, लोकअभिरक्षक कार्यालय अहमदनगर यांनी NALSA (DAWN – Drug Awareness and Wellness Navigation for a Drug Free India) योजना, २०२५ ही राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (NALSA) ची सुधारित योजना बाबत मार्गदर्शन केले. अॅड. श्री. शिवाजी कराळे, अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय, वकील संघ, अहमदनगर, यांनी बंदी जणांच्या कायदेशीर हक्काबाबत मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अॅड. श्री. पिंटू पाटोळे, यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक, श्री. संतोष कवार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करणेकामी अहमदनगर जिल्हा कारागृह, वर्ग-२, कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.