Constitution Day : अरणगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले!

Constitution Day : अरणगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले!

0

Constitution Day : अहिल्यानगर : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (Zilla Parishad Primary School), अरणगाव येथे २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त (Constitution Day) विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या हक्क व कर्तव्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांना संविधानाचे मार्गदर्शन

यावेळी अरणगावचे सरपंच पोपट पुंड यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, तसेच नागरिक म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत मूल्यांचे प्रत्येकाने आपल्या जीवनात पालन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव दृढ होण्यास मदत (Constitution Day)

कार्यक्रमास सरपंच पोपट पुंड, उपसरपंच तथा जिल्हा परिषद शाळा सदस्य नम्रता कांबळे, मार्केट कमिटी संचालक जीवन कांबळे, युवा नेते राहुल कांबळे, युवा उद्योजक अतुल कोके, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Constitution Day : अरणगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले!
Constitution Day : अरणगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले!

संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी आदरभावना निर्माण होण्यासोबतच लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत झाली. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या आचरणात उतरावीत, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.