
Environmental Conservation Awareness : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (AMC) वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ आणि माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भूषण नगर येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेविषयी जनजागृती (Environmental Conservation Awareness) उपक्रम राबविण्यात आला.
3R Principles चे महत्त्व
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, 3R Principles अर्थात Reduce (कचरा कमी करणे), Reuse (पुनर्वापर करणे) आणि Recycle (पुनर्चक्रण करणे) या तत्त्वांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच प्लास्टिक बंदी, पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गातील पंचतत्त्वांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्वच्छता हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य (Environmental Conservation Awareness)
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यावर विशेष भर देण्यात आला. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी हा स्वच्छतेचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.


