
Judge Shivaji Kachare : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली (NALSA), मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई (MSLSA), व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर तसेच प्रियदर्शनी पब्लिक स्कुल, भिंगार यांच्या संयुक्त विदयमाने बुधवार, दिनांक २५/११/२०२६ रोजी प्रियदर्शनी पब्लिक स्कुल, भिंगार या ठिकाणी “सुरक्षित बचपन अभियान” या कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमाच्या मोहिमेचा शुभारंभ पथनाट्यच्या माध्यमातून करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी कचरे (Judge Shivaji Kachare), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर तसेच महेश जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, सागर ढिकले, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम, अहमदनगर, अंजली बोधक मॅडम, प्राचार्य, प्रियदर्शनी पब्लीक स्कुल भिंगार, ॲड. श्रीमती पूनम जानराव-मुनोत, सहायक, लोकअभिरक्षक कार्यालय अहमदनगर, ॲड. आरती सरोदे, पॅनेल विधिज्ञ, अहमदनगर हे उपस्थित होते.
हक्का व सुरक्षिततेबाबत जागरूकतेचे आवाहन
विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव, स्वतःच्या हक्काचे संरक्षण आणि सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यात दूरदृष्टी ठेवण्याचा दृष्टीकोन आत्मसात करायला हवा जेणेकरून आपण या देशाचे एक सजग नागरिक घडवू शकतो असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरक्षित भविष्यासाठी यश संपादन करताना तुम्हाला शिक्षकांचे व गुरुजनांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिवाजी कचरे साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, अहमदनगर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. महेश जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर यावेळी बोलतांना त्यांनी, विद्यार्थ्याला ध्येय प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. विद्यार्थ्याला सुरक्षित व आनंदी बालपण जगता आले पाहिजे यासाठी बालविवाह व बालमजुरी प्रतिबंधित कायदा अस्थित्वात आहे. बालविवाह व बालमजुरी रोखण्यासाठी आपण जागरूक असणे गरजेचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संकटात १०९८, ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा (Judge Shivaji Kachare)
संकटात सापडल्यास १०९८, ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याबाबत व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक १५१०० वर संपर्क करावा या विषयी माहिती देण्यात आली. ॲड. पूनम जानराव-मुनोत, सहायक, लोकअभिरक्षक कार्यालय अहमदनगर, यांनी विध्यार्थ्यांना पोक्सो कायदा त्यामधील तरतुदी बाबत मार्गदर्शन केले. सागर ढिकले, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम, अहमदनगर यांनी विध्यार्थ्यांना सामाजिक माध्यम किंवा सोशल मीडिया यावरील फसवणूक कशी होते या बाबत माहिती दिली. तसेच तुम्ही तुमच्या पालकांनाही याबाबत माहिती द्या. तुमच्या सोबत किंवा पालकांसोबत अशी फसवणूक झाली तर आपण हेल्पलाईन नंबर १९३० वरती संपर्क करावा याबाबत मार्गदर्शन केले.


