District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

शेतरस्त्यांच्या न्यायासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात रात्रभर मुक्काम!

0
District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

District Collector Office : नगर : शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यांसाठी वर्षानुवर्षे संघर्ष सुरू असतानाच, न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (District Collector Office) गेलेल्या शेतकऱ्यांनाच अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या (Shivpanand Farm Road Movement) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण (Hunger Strike) सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार करत शेतकऱ्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मुक्काम केला.

नक्की वाचा : ऊसदराचा तिढा कायम! ३७०० रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम; तोडगा निघाला नाही तर २८ तारखेपासून आंदोलनाचा एल्गार

District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

शेतकऱ्यांचा सन्मान हाच संघर्षाचा केंद्रबिंदू

बंद शिवपाणंद शेतरस्ते खुले करण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनाचा खुलासा मिळावा आणि शेतरस्त्यांसाठी दाखल केलेल्या अर्जांच्या सद्यस्थितीचा आढावा घेता यावा, यासाठी संविधान दिनी शेतकरी व चळवळीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकरी बांधवांसह माता-भगिनींचा अवमान झाल्याने चळवळीने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. शेतजमिनीपर्यंत जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतीच्या विकासाचा आणि उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. बंद शेतरस्ते खुले व्हावेत, यासाठी शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनाच अपमानास्पद वागणूक मिळणे दुर्दैवी असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
District Collector Office : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

बंद शेतरस्ते तातडीने खुले करा (District Collector Office)

संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाची निष्पक्ष चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, चळवळीच्या वतीनेही मा. मंत्री महोदय तसेच उच्च अधिकाऱ्यांना पत्र व मेल द्वारे याबाबत कळविण्यात येणार आहे. तसेच बंद शिवपाणंद शेतरस्ते तातडीने खुले करावेत, प्रलंबित अर्जांचा कालबद्ध आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. “शेतकऱ्यांना दयेची भीक नको, त्यांच्या हक्काचा शेतरस्ता हवा; अपमान नको, सन्मान हवा! याच न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रात्र काढणाऱ्या शेतकऱ्यांचा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे.”

रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम; संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार

दिवसभर उपोषण आणि आंदोलन केल्यानंतरही शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच रात्र काढली. शेतरस्त्यांचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा ठाम निर्धार चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी व्यक्त केला.संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी, अधिकाऱ्यांवरील कारवाई आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका चळवळीने घेतली आहे. यावेळी शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, नाथाभाऊ शिंदे, रवींद्र खुडे, बाळासाहेब थोरात, पोपट शेळके, संजय साबळे, बाबुराव गुंड, दशरथ वाळुंज, सविता मरकड, रेखा इंगळे, नामदेव वाकचौरे, विठ्ठल ठोकळ, पोपट हरदास, सुभाष आव्हाड, भाऊसाहेब वाळुंज, कल्याण जगदाळे, मारुती गाडे, रमेश भवन आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.