
Illegal sale of beef : नगर : शहरातील मुकूंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोमांस विक्री(Illegal sale of beef) वर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ५५० किलो गोमांस, दोन सत्तूर, दोन चाकू आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण १ लाख ६६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी इरफान एजाज कुरेशी (वय ४०, रा. मुकूंदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पप्पू फैयाज कुरेशी हा संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोमांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, मुकूंदनगरमधील संजोगनगर परिसरात गोमांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
५५० किलो गोमांस जप्त (Illegal sale of beef)
इरफान कुरेशी हा नूर बानू शेख यांच्या घरावरील पत्र्याच्या खोलीत गोमांस विक्री करत असल्याचे समजताच पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका खोलीत गोमांसाचे तुकडे केले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी इरफान कुरेशी याला ताब्यात घेत घटनास्थळावरून ५५० किलो गोमांस १ लाख ६५ हजार रुपये, दोन सत्तूर व दोन चाकू ६०० रुपये तसेच एक इलेक्ट्रिक वजनकाटा (१ हजार रुपये) असा एकूण १ लाख ६६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाल पप्पू फैयाज कुरेशी (रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) याच्या मालकीचा असल्याची माहिती ताब्यातील आरोपीने चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पप्पू कुरेशी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.


