Threat of an acid attack : लग्नास नकार दिल्यास अ‍ॅसिड फेकून अत्याचार करण्याची धमकी; कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Threat of an acid attack : लग्नास नकार दिल्यास अ‍ॅसिड फेकून अत्याचार करण्याची धमकी; कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0

Threat of an acid attack : नगर : युवतीचा पाठलाग करून तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी करणार्‍या तरूणाने लग्नासाठी दबाव टाकत अ‍ॅसिड फेकण्याची आणि अत्याचार करण्याची धमकी (Threat of an acid attack) दिल्याची घटना केडगाव उपनगरात घडली. याप्रकरणी विराट चिपाडे (रा. सरोदेनगर, केडगाव) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवतीच्या घरात घुसून शिवीगाळ करत तिच्या वडिलांना मारहाण

याबाबत 21 वर्षीय युवतीने गुरूवारी (ता.२६) फिर्याद दिली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विराट चिपाडे हा तिचा पाठलाग करून त्रास देत होता. मोबाईल क्रमांक मागून बोलण्याचा आग्रह करत होता. याबाबत युवतीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी विराटच्या आई-वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विराट याने युवतीच्या घरात घुसून शिवीगाळ करत तिच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर ता. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास युवतीच्या घराच्या खिडकीवर दगड फेकून काच फोडण्यात आली. विराट चिपाडे आणि चार अनोळखी तरूणांनी लोखंडी रॉड, चॉपर व लाकडी काठ्या घेऊन घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गळ्यातील सोन्याची साखळी हिसकाल्याचा आरोप (Threat of an acid attack)

यावेळी विराटने युवतीला लग्न करण्यासाठी दबाव टाकत, लग्नास नकार दिल्यास अ‍ॅसिड फेकून अत्याचार करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा हात पकडून घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केला असता विनयभंग केला. वडील व भाऊ तिला सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या झटापटीत विराटने युवतीच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची बदाम असलेली साखळी हिसकावून घेतली असल्याचा आरोप आहे.