Accident : पाथर्डी : तालुक्यातील चितळवाडी शिवारात उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला दुचाकीची जोरदार धडक (Accident) बसल्याने बळीराम मधुकर जिवडे (वय ४२, रा. लांडकवाडी) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता. २४) दुपारी बारामती–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर (Baramati–Chhatrapati Sambhajinagar State Highway) घडली.
नक्की वाचा : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष
उभ्या असलेल्या टँकरला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, चितळवाडी शिवारात पाणी वाटपासाठी टँकर उभा होता. त्यावेळी लांडकवाडी येथील बळीराम जिवडे हे माणिकदौंडी कडून दुचाकीवरून कडा (ता. आष्टी, जि. बीड) येथे जात असताना त्यांच्या दुचाकीची उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम (Accident)
बळीराम जिवडे यांच्या पत्नी कडा येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांना डबा देण्यासाठी ते घरातून निघाले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. कड्याकडे जात असतानाच हा भीषण अपघात घडला आणि जिवडे यांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेमुळे लांडकवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून जिवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.



