Accused Arrested : खरवंडी कासार दरोडा प्रकरणाची उकल; एका आरोपीला अटक

घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कुटुंबीयांना मारहाण

0
Accused Arrested : खरवंडी कासार दरोडा प्रकरणाची उकल; एका आरोपीला अटक
Accused Arrested : खरवंडी कासार दरोडा प्रकरणाची उकल; एका आरोपीला अटक

Accused Arrested : पाथर्डी : खरवंडी कासार (Kharvandi Kasar) परिसरातील किर्तनवाडी येथे झालेल्या गाजलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणातील एका संशयित आरोपीला अटक (Accused Arrested) करण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे दरोड्याच्या तपासाला वेग आला असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस ठाण्याचे (Pathardi Police Station) पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. 

नक्की वाचा : राहाता नगरपरिषदेच्या वतीने ‘मॅरेथॉन 2026’चे आयोजन; स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चकलांबा येथून ताब्यात

पोलीस हवालदार दत्ता गव्हाणे, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, इजाज सय्यद,ज्ञानेश्वर शिंदे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपीचा माग काढला. संशयित आरोपी राहुल रज्जाक काळे (वय २७, रा. टाकळी मानूर, ता. पाथर्डी, सध्या रा. चकलांबा, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला शनिवारी (ता. १३) चकलांबा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खरवंडी कासार परिसरातील किर्तनवाडी येथे १० जून रोजी पहाटे सात ते आठ जणांच्या सशस्त्र टोळीने दोन घरांवर दरोडा टाकून साडेचार लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लुटला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कुटुंबीयांना मारहाण (Accused Arrested)

शेतकरी रावसाहेब बाजीराव कितने यांच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी घराचे कुलूप तोडून प्रवेश करत कुटुंबीयांना मारहाण केली व सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लुटली. या घटनेत कितने कुटुंबाचे सुमारे ३ लाख ७ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्याच टोळीने बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांनाही मारहाण केली. या ठिकाणाहून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तसेच परिसरातील आणखी दोन घरांत चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपीला जेरबंद करण्यात यश

दरोडा आणि वाढत्या चोरीच्या घटनांविरोधात १२ जून रोजी खरवंडी कासार येथे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत रस्ता रोको आंदोलन केले होते. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पथकांना सक्रिय करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर करीत आहेत.

दरोडा प्रकरणाच्या उकल दिशेने महत्त्वाचे पाऊल

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या दरोड्यात सात ते आठ आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. एका आरोपीच्या अटकेमुळे दरोडा प्रकरणाच्या उकल दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून पुढील तपासातून आणखी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.