Accused carrying a sword apprehended : तलवार बाळगणारा संशयित आरोपी जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

Accused carrying a sword apprehended : तलवार बाळगणारा संशयित आरोपी जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

0

Accused carrying a sword apprehended : नगर : घराच्या पाठीमागील गवतात धारदार तलवार लपवून ठेवल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police Station) तत्काळ कारवाई करत एका तरुणाला तलवारीसह पकडले (Accused carrying a sword apprehended). दीपक राजेश बेरड (वय २८, रा. तुक्कड ओढा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

गोपनीय बातमीदारामार्फत माहिती

ही कारवाई २१ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत दीपक बेरड याने घराच्या पाठीमागील गवतात तलवार लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तपास पथकाला दिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुन्हा दाखल (Accused carrying a sword apprehended)

त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. काही वेळातच दीपक बेरड हा हातात लोखंडी तलवार घेऊन येताना पोलिसांना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला जागीच पकडले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी तलवार आढळून आली. तलवार कशासाठी आणली होती, याबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. या प्रकरणी दीपक बेरड याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस हवालदार दीपक शिंदे, रवींद्र टकले आणि कैलास सायंबर यांच्या पथकाने केली.