Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी

Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी

0

सलग 8 सामने जिंकून खेळात वर्चस्व; सुमन फुटबॉल क्लब ठरले उपविजयी

Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : नगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) आयोजित अहिल्यानगर लीग 2025-26 स्पर्धेचा (Ahilyanagar League 2025-26 Football Tournament) शानदार समारोप चुरशीच्या अंतिम सामन्याने झाला. भुईकोट किल्ला मैदान येथे अंतिम सुपर लीग सामना फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब (Firodiya Shivajians Football Club) विरुध्द सुमन फुटबॉल क्लब यांच्यात झाला. अत्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात फिरोदिया शिवाजियन्स संघाने सुमन फुटबॉल क्लबवर वर 3-2 गोलने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी
Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी

फिरोदिया शिवाजियन्स संघाची शानदार कामगिरी

फिरोदिया शिवाजियन्स संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत सलग 8 सामने जिंकले तसेच लीग आणि सुपर लीगमध्ये पूर्ण गुण मिळवत अजिंक्यपद संपादन केले. फिरोदिया शिवाजियन्स कडून अभय साळवे याने 10 व्या मिनिटाला पहिले गोल केले. त्यानंतर हिमांशू चव्हाण याने 26 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत आघाडी वाढवली. सुमन फुटबॉल क्लब कडून अविनाश शिंदे याने 29 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत फरक कमी केला. दुसऱ्या हाफमध्ये अभय साळवे याने 45 व्या मिनिटाला पुन्हा गोल करत संघाची आघाडी मजबूत केली. अखेरीस अविनाश शिंदे याने 70 व्या मिनिटाला गोल करत सामना रंगतदार केला.

Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी
Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी

12 संघांचा सहभाग (Ahilyanagar League 2025-26 Football Tournament)

या लीग स्पर्धेत 12 संघांचा सहभाग होता. सुपर लीगमध्ये फिरोदिया शिवाजियन्स, सुमन फुटबॉल क्लब, बाटा फुटबॉल क्लब आणि गुलमोहर फुटबॉल क्लब या चार संघांनी प्रवेश केला. सुपर लीगमध्ये एकूण 6 सामने खेळविण्यात आले. अंतिम सुपर लीग क्रमवारीत प्रथम- फिरोदिया शिवाजियन्स, द्वितीय- सुमन एंटरप्रायझेस, तृतीय- बाटा फुटबॉल क्लब आणि चतुर्थ क्रमांकावर गुलमोहर फुटबॉल क्लब राहिले.

बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे पुणे येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी
Ahilyanagar League 2025-26 Football Tournament : अहिल्यानगर लीग 2025-26 फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स विजयी

देशमुख म्हणाले की, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन मागील 54 वर्षापासून शहरात फुटबॉल खेळ रुजवून खेळाडू घडवित आहे. या गौरवास्पद कामगिरीने आज फुटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू घडत आहे. खेळात विजय-पराभव महत्त्वाचा नसून खेळाडूवृत्ती महत्त्वाची असते. खेळातून नागरिकांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होवून चांगले नागरिक घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मानद सचिव रोनाप फर्नांडिस, असोसिएशनचे ज्येष्ठ व आधारस्तंभ रिशपालसिंग परमार, संयुक्त सचिव व्हिक्टर जोसेफ, कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे, उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव प्रदीप जाधव, खजिनदार तपन परमार आणि जेव्हिअर स्वामी यांचे विशेष योगदान लाभले. स्पर्धेच्या आयोजनासाठी अभय साळवे, अभिषेक सोनवणे आणि राजेश अँथनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी सर्व सहभागी संघ, खेळाडू, पंच, आयोजक आणि फुटबॉलप्रेमी यांचे अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट पंचगिरी केल्याबद्दल जिल्हा फुटबॉल असोसिएशन रेफरी पॅनेलचेही कौतुक करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय प्रसाद पाटोळे यांनी करून दिला. आभार कार्यकारिणी सदस्या पल्लवी सैदाणे यांनी मानले.