Ahilyanagar Municipal Corporation | योग दिन पुरता मर्यादित न राहता दररोज योग करा – डॉ. सतीश राजूरकर

0

Ahilyanagar Municipal Corporation | नगर : अहिल्यानगर महापालिका (Ahilyanagar Municipal Corporation) आरोग्य विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आशा सेविका, सिस्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योग प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमात कविता खिलारी सिस्टर यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यविषयक योगप्रकारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना सुदृढ व निरोगी जीवनाचा संदेश दिला.

हे वाचा – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना अहिल्यानगरच्या कृषिकन्येने दिले योगाचे धडे; प्रियंका शिंदे हिची योग क्षेत्रात मोठी झेप

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग (Ahilyanagar Municipal Corporation)

या कार्यक्रमास मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. वृषाली आरू, कविता खिलारी, विकास गिते, भाऊसाहेब सुडके यांच्यासह आशा सेविका, सिस्टर्स आणि आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून योगाचा स्वीकार केला पाहिजे. योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तणावमुक्त आणि उत्साही राहण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवन अधिक आनंदी व संतुलित बनते.

अवश्य वाचा – पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम; सक्कर चौक ते चाणक्य चौक परिसरातील पावसाळी गटारींची सफाई

योगासनांचा सराव (Ahilyanagar Municipal Corporation)

कार्यक्रमात उपस्थित आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध योगासनांचा सराव करत योगाचे महत्त्व जाणून घेतले. योगाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धन, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला.

हे पहा – पाणी टंचाईचं मोठं संकट! “गावात टँकर, शहरात उधळपट्टी… असं कसं चालेल?

अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि भारतीय योग संस्था, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना योगाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून नियमित योगाभ्यासाचा संकल्पही अनेकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here