
Amarchand Nayyar Vidyamandir : नगर : बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या दुर्गादिवी अमरचंद नय्यर विद्यामंदिर (Amarchand Nayyar Vidyamandir) शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विविध स्पर्धांमध्ये (Competition) उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा (Awards Ceremony) उत्साहात झाला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा प्रत्यय आला.
नक्की वाचा : अक्षय कर्डिले यांना मत म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना वाहिलेली श्रद्धांजली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
मंथन आणि स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत आपली छाप पाडली. मंथन परीक्षेत कु. अन्वी अमोल बुरुंगुळे (२री), कु. सिया अतुल हापसे (३री), चि. श्रीनिवास उमाकांत फड (४थी), कु. अनुष्का दीपक जासूद (४थी), कु. दुर्वा सुनील मिटकरी (४थी), चि. कार्तिक रमेश जाधव (४थी) आणि कु. तनिष्का आसाराम रानमोरे (४थी) यांनी यश मिळवले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांचे मार्गदर्शन लाभले (Amarchand Nayyar Vidyamandir)
स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत कु. सिया अतुल हापसे (३री), चि. श्रीनिवास उमाकांत फड (४थी), चि. कार्तिक रमेश जाधव (४थी) आणि कु. अनुष्का दीपक जासूद (४थी) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.यशस्वी विद्यार्थ्यांना रेखा भालेराव, मंगल ढाकणे, सविता बिडवे, अतुल खांदवे, स्वाती मुरकुटे आणि कावेरी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक डॉ. एकनाथ मोटे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव बाळासाहेब पवार होते, तर उपाध्यक्ष बी. बी.आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करत पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सांस्कृतिक स्पर्धेतही अव्वल स्थान मिळवले
दरम्यान, महापालिकेच्या शहरस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून सांस्कृतिक स्पर्धेतही अव्वल स्थान मिळवले आहे. क्रीडा स्पर्धेसाठी लक्ष्मण माने, स्वाती पवार व अतुल खांदवे यांचे, तर सांस्कृतिक स्पर्धेसाठी पुष्पा म्हस्के व नीता आगलावे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण माने सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद बढे यांनी मानले.


